त्सुनामीनंतर इंडोनेशियात अन्नपाण्यासाठी लूटमार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । पालू (इंडोनेशिया)

इंडोनेशियाच्या सुलावेसी बेटांना भूकंप आणि सुनामीच्या बसलेल्या तडाख्यात आतापर्यंत हजारो जण मृत्युमुखी पडले आहेत. नैसर्गिक संकटानंतर आता रोगराई पसरू लागली आहे. मृतदेह दफन करण्याचे काम सुरू झाले आहे. अद्याप अनेक जण इमारतींच्या ढिगाऱयाखाली गाडले गेले आहेत. भूकंपाने पालू शहरात अन्न आणि पाण्याचे दुर्भीक्ष्य जाणवत आहे. त्यातच नागरिकांनी दुकाने आणि सार्वजनिक मालमत्तेची लूट सुरू केली आहे.

सुमारे 7.5 तीक्रतेच्या भूकंपाचे हादरे बसल्यानंतर पालू शहरात त्सुनामीचे पाणी घुसले. संपूर्ण शहर उध्वस्त झाल आहे. शहरात लष्कर तैनात करण्यात आले असून युद्धपातळीवर बेपत्ता लोकांचा शोध सुरू आहे. रोगराई पसरू नये, म्हणून मृतदेहांचे एकाचवेळी दफन करण्यात येत आहे. मृतांची संख्या हजारोंपेक्षा अधिक आहे, असे राष्ट्रीय आपत्कालीन एजेंसीचे प्रवक्ते सुतोपो पुरवो यांनी सांगितले. जिवंत राहिलेल्या व्यक्तींनी खाद्यपदार्थ्यांच्या दुकानांची लूटमार सुरू केली  आहे. पोलीसही त्यांना थांबवू शकत नाहीत. लुटमारीच्या भीतीने नागरिक गावे सोडून जात आहेत. आमच्याकडे दुसरा पर्याय नाही. भूकेने मरण्यापेक्षा दुकाने लुटलेले बरे. आम्हाला अन्न पाहिजे, असे पालूतील भूकंप पीडीत नागरिकांचे म्हणणे आहे.

पालू शहरातील हजारो लोकांनी आपत्कालीन केंद्रात आश्रय घेतला आहे. हजारो लोक तंबूत राहत आहेत. तेवढेच लोक जखमी अवस्थेत इस्तितळात उपचार घेत आहे. एका हॉटेलाची इमारत कोसळून 150 लोक ढिगाऱयाखाली अडकले आहेत. त्यातील एका महिलेला जिवंत बाहेर काढण्यात यश आले आहे.

-भूकंप आणि सुनामीनंतर सुलावेसी बेटावरील मृतांची संख्या 1203 इतकी झाली आहे. आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेच्या अंदाजानुसार ही संख्या दोन हजार रुपयांपर्यंत पोहोचू शकते. अनेक जण अद्याप ढिगाऱयाखाली अडकले आहेत, तर अनेक जण बेपत्ता आहेत. डोंगाला शहरातील लोकसंख्या अंदाजे तीन लाख आहेत. तेथील अनेक परिसरात मदत आणि बचावकार्य पथक पोचले नाही.

-त्सुनामीचा इशारा देणारी यंत्रणा फेल

सुलावेसी बेटावर वारंवार भूकंपाचे धक्के जाणवतात. मात्र तरीही त्सुनामीचा इशारा प्रशासनातर्फे का दिला जात नाही, असा सवाल उपस्थित झाला आहे. त्सुनामी इशारा यंत्रणा व्यवस्थितपणे कार्यरत नसल्याने हजारो लोकांना प्राण गमवावे लागले आहे. प्रशासनाच्या मते नागरिकांना त्सुनामीचे मॅसेज 30 मिनिटे आधी पाठवण्यात आले होते. मात्र अनेकांना ते मिळालेच नाहीत. सुलावेसीच्या किनारपट्टीवर कोणतीही सायरन यंत्रणा नसल्याचेही उघड झाले आहे.