‘अब ना मैं हूँ, ना बाकी हैं ज़माने मेरे​, फिर भी मशहूर हैं शहरों में फ़साने मेरे’, राहत इंदौरी यांचे निधन

1390

उर्दू भाषेचे प्रसिद्ध शायर राहत इंदौरी यांनी जगाचा निरोप घेतला आहे. सोमवारी त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने उशीरा रात्री त्यांना अरविंदो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जिथे हृदय विकाराच्या झटक्याने मंगळवारी त्यांचा मृत्यू झाला. याआधी त्यांनी आपला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती ट्विट करून दिली होती.

याबाबत ट्विट करत त्यांनी लिहिलं होत की, ‘कोविडची सुरुवातीची लक्षणे आढळून आल्याने मी काल तपासणी करून घेतली, ज्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. अरविंदो रुग्णालयात मी उपचार घेत आहे. प्रार्थना करा की लवकरात लवकर मला या आजाराला हरवता येईल. आणखी एक विनंती आहे, कृपया कोणीही मला किंवा माझ्या कुटुंबीयांना फोन करू नये, माझ्या प्रकृतीबाबतची माहिती आपल्याला ट्विटर व फेसबुकद्वारे मिळत राहील.’

राहत इंदोरी हे एक प्रसिद्ध शायर होते. त्यांनी बॉलिवूडसाठी बरीच गीते लिहिली आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांचा ‘बुलाती है मगर जाने का नहीं’ हा शेर खूप चर्चेत आला होता. त्यांच्या निधनामुळे कलाविश्वावर आणि चाहत्यांवर शोककळा पसरली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या