छातीत दुखू लागल्याने इंद्राणी मुखर्जी जे. जे. रुग्णालयात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

शीना बोरा हत्याकांडातील प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जीला शुक्रवारी रात्री उशिरा जे. जे. रुग्णालयात हलविण्यात आले. कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या इंद्राणीच्या छातीत दुखू लागल्याने तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिच्या आवश्यक त्या तपासण्या करून सायंकाळी ७.३० वाजता पुन्हा भायखळा येथील महिला कारागृहात रवानगी करण्यात आली. यापूर्वी एप्रिलमध्येही औषधांच्या अतिसेवनामुळे इंद्राणीवर जे. जे. रुग्णालयात उपचार करण्यात आले होते.