इंद्राणी मुखर्जीला साडेसहा वर्षांनी जामीन  

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शीना बोरा हत्यांकाडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी हिला तब्बल साडेसहा वर्षांनी सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. इंद्राणी साडेसहा वर्षांपासून तुरुंगात आहे. त्यात खटला लांबला आहे. इंद्राणीचे सहआरोपी जामिनावर बाहेर आहेत. त्यामुळे तिला जामीन मंजूर करण्यात आला आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने जामीन देताना स्पष्ट केले. सीबीआयने मुंबईत घडलेल्या हायप्रोफाईल हत्याकांडाचा तपास करत इंद्राणी मुखर्जीला अटक केली होती. सुरुवातीला शीना ही इंद्राणी मुखर्जीची बहीण असल्याचे म्हटले जात होते. मात्र, पोलिसांच्या चौकशीत ती इंद्राणी मुखर्जीची पहिल्या पतीची मुलगी असल्याचे उघड झाले. मुंबईतील उच्चभ्रू समाजातील ऑनर किलिंगची ही पहिलीच घटना होती.