‘त्या’ विधानावर इंदुरीकर महाराजांनी व्यक्त केली दिलगिरी, पत्रक जारी

1260
indurikar maharaj apology letter

‘मी गेल्या 26 वर्षापासून समाज प्रबोधनाचं काम कीर्तनाच्या माध्यमातून करत आहे. माझ्या वक्तव्यामुळे जर कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो’, असे हभप इंदुरीकर महाराज देशमुख यांनी मंगळवारी जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

गेल्या आठवड्यापासून इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनातील विधाना विषयीची चर्चा सर्वत्र सुरू आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अनेकांनी त्यांवर टीका केली आहे. तर महाराजांच्या समर्थनात देखील अनेकजण पुढे आले आहेत.

indurikar-maharaj-apology

इंदुरीकर महाराज यांनी कोणीही रस्त्यावर उतरू नये व कायदा हातात घेऊ नये असे आपल्या अनुयायांना सांगितले होते. त्यांनी आज दिलेल्या दिलगिरी पत्रात म्हटले आहे की, ‘महाराष्ट्रातील तमाम वारकरी कीर्तनकार, शिक्षक, शिक्षिका, डॉक्टर, वकील व माता समान असलेला तमाम महिलावर्ग आठ दिवसापासून माझ्या कीर्तन सेवेची त्या वाक्यामुळे सोशल मीडिया व इलेक्ट्रोनिक मीडियासह इतर समाज माध्यमात माझ्या अभ्यासानुसार मी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे. तरी मी वारकरी संप्रदायाचा पाईक असून मी माझ्या 26 वर्षाच्या कीर्तन रुपी सेवेत समाजप्रबोधन, समाज संघटन, अंधश्रद्धा निर्मूलन, विविध जाचक रूढी-परंपरा यावर भर दिला होता. माझ्या कीर्तन रुपी सेवेतील या वाक्याने जर कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो व माझ्यावरील प्रेम वृद्धिंगत व्हावे, असे इंदुरीकर महाराज यांनी म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या