
आम्ही पाच हजार मागितले तर पैशांचा बाजार मांडला, असा आरोप होतो. मात्र गौतमीने तीन गाणे वाजवले की तीन लाख रुपये मोजतात. तिच्या कार्यक्रमात मारामारी, राडा होतो. 200 पोरांचे गुडघे फुटतात. आम्हाला मात्र टाळ वाजवून काहीही मिळत नाही. साधे संरक्षणदेखील दिले जात नाही, असा आरोप इंदुरीकर महाराजांनी केला आहे. कीर्तनकार इंदुरीकर महाराज हे आपल्या वेगवेगळय़ा विधानांनी नेहमीच चर्चेत असतात. आता त्यांनी थेट नृत्यांगना गौतमी पाटीलवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. बीडमध्ये एका कीर्तनात बोलताना इंदुरीकर महाराजांनी हे वक्तव्य केले आहे.


























































