
हिंदुस्थानने सिंधु जलकरार रद्द केल्यानंतर पाकिस्तानचा चांगलाच तिळपापड झाला होता. मात्र, त्यानंतरही पाकिस्तानच्या वर्तनात काहीही बदल झाला नसून त्यांच्या हिंदुस्थानविरोधात कुरघोडी सुरू आहेत. त्यामुळे आता हिंदुस्थानने पाकिस्तानची पाणी कोंडी करण्यासाठी पावले उचलली आहेत. त्यामुळे पाकिस्तानला पाण्याच्या एकेका थेंबासाठी वणवण करावी लागणार आहे. त्यामुळे पाकिस्तानची पाणी कोंडी करण्याची हिंदुस्थानची योजना म्हणजे पाकिस्तानच्या बरबादीचे काऊंटडाऊंन सुरू असल्याचे मानले जात आहे.
सिंधू नदीचे पाणी अडवल्यानंतर, हिंदुस्थानने पाकिस्तानचा घसा कोरडा करण्यासाठी योजना आखली आहे. हिंदुस्थानकडून जम्मू आणि काश्मीरच्या नद्यांवर एकामागून एक धरणांचे जाळे बांधले जात आहे. महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक प्रकल्पावर आपत्कालीन स्थितीत काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे हे प्रकल्प वेळत पूर्ण होणार आहेत.
जम्मू आणि काश्मीरच्या बर्फाळ खोऱ्यातून वाहणाऱ्या चिनाब, झेलम आणि सिंधू नद्यांवर हिंदुस्थान धरणांचे जाळे उभारत आहे. त्यामुळे या नद्यांमधून पाकिस्तानात वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा हिंदुस्थानसाठी उपयोग होणार आहे. त्यामुळे मोठा परिसर ओलीताखाली येणार आहे. सिंधू जल करार रद्द करत हिंदुस्थानने या नद्यांवर धरणांचे जाळे बांधण्यास सुरुवात केली आहे. एक-दोन नव्हे तर अनेक मोठी धरणे बांधली जात आहेत. सर्व आपत्कालीन स्थितीत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बजेट आधीच देण्यात आले आहे. वेळ निश्चित करण्यात आली आहे. हिंदुस्थान आता नद्यांमधील पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब ठेवणार आहे.

























































