
प्रसिद्ध इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर किली पॉल याने पुन्हा एका हिंदुस्थानी गाण्यावर केलेला डान्स व्हायरल झाला आहे. किली पॉल याने हिंदुस्थानी भाषांमधील गाण्यांवर अनेकदा डान्स करून त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर टाकले आहेत. आता त्याने ‘कमर करे लच लच’ या भोजपुरी गाण्यावर केलेला भन्नाट डान्स व्हायरल झाला आहे. किली पॉल हा त्याच्या पारंपरिक वेशभूषेत दिसतो. गाण्यावर त्याने धरलेला ठेका, पदलालित्य आणि हावभाव पाहून चाहतेही घायळ झाले आहेत. त्याच्या डान्सवर नेटकऱयांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या असून आतापर्यंत या व्हिडीओला 50 लाखांपेक्षा जास्त वेळा पाहिले आहे.

























































