परप्रांतियांना आश्रय देऊन माहिती लपवल्याप्रकरणी गुन्हा दाखल

2306

देशात कोरोना विषाणू सारख्या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असताना लातूर जिल्ह्यात सात जणांनी परप्रांतीयांना धार्मिक स्थळांमध्ये आश्रय दिला. ही माहिती लपवल्याप्रकरणी पोलिसांनी सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

निलंगा येथे बारा परप्रांतीय निलंग्यात दाखल झाले असताना काहीजणांनी  या परप्रांतीयांना निलंगा येथील धार्मिक स्थळांमध्ये आश्रय दिला व सदरील माहिती प्रशासनापासून लपवून ठेवली. यानंतर निलंगा पोलिसांनी या बारा परप्रांतीयांना ताब्यात घेऊन त्यांची तपासणी केली असता यातील कोरोना बाधित 12 पैकी आठ रुग्ण आढळून आले. या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी  निलंगा येथील सहा व गुबाळ येथील एका व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल चोरमले  करत असून चौकशीअंती यांना मदत केलेल्यांची सर्वांना ताब्यात घेणार असल्याचे सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या