आयएनएस युद्धनौका ‘तमाल’ इटलीत!

हिंदुस्थानी नौदलाची नवीन अत्याधुनिक युद्धनौका ‘तमाल’ सध्या इटलीच्या दौऱ्यावर आहे. 13 ऑगस्टला इटलीतील नेपल्स बंदरात पोहोचलेल्या आयएनएस युद्धनौका तमालने 15 ऑगस्टला हिंदुस्थानचा स्वातंत्र्य दिन इटलीत साजरा केला. नेपल्सला पोहोचण्याआधी इटलीच्या नौदलाच्या लँडिंग प्लॅटफॉर्म डॉक आयटीएस त्रिएस्तेसोबत पॅसेक्स अभ्यासात सहभाग घेतला. यावेळी दोन्ही नौदलांनी संचालन आणि हवाई मोहिमेत संयुक्त अभ्यास केला. आयएनएस तमालला 1 जुलैमध्ये नौदलाच्या ताफ्यात सहभागी करून घेतले आहे.