
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम हे रील्स आणि पह्टो-व्हिडीओ शेअर करण्यासोबतच कोटय़वधी यूजर्ससाठी चॅट अपसुद्धा बनले आहे. झेन जीसाठी हे व्हॉट्सअॅपप्रमाणे चॅटिंगसाठी वापरले जाते. परंतु कंपनीने यात मोठा बदल करण्याचे ठरवले असून येत्या 8 मे 2026 पासून इन्स्टाग्रामच्या डायरेक्ट मेसेज आता एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड राहणार नाहीत. त्यामुळे इन्स्टाग्राम डीएम आता आधीसारखे सुरक्षित राहणार नाहीत.
एंड-टू-एंड एन्क्रिप्शन म्हणजे जेव्हा एखादा यूजर्स दुसऱ्या यूजर्सला एखादा मेसेज पाठवतो. तेव्हा तो मेसेज थेट त्या व्यक्तीपर्यंत जात नाही. आधी सर्व्हरवर जातो. एंड-टू-एंड एन्क्रिप्शन असल्यावर मेसेज एका खास कोडमध्ये बदलला जातो. हा कोड फक्त सेंडर आणि रिसीव्हरकडे असलेल्या ‘की’नेच उघडता येतो. यामध्ये कोणीही म्हणजे कंपनीसुद्धा मेसेज वाचू शकत नाही. परंतु आता इन्स्टाग्रामवरचे एंड-टू-एंड एन्क्रिप्शन बंद होणार आहे. हे बंद करण्यामागे कंपनीने काही माहिती दिली आहे. इन्स्टाग्रामचे खूपच कमी यूजर्स एन्क्रिप्टेड चॅट वापरत होते. तसेच प्रायव्हेट चॅटसाठी व्हॉट्सअॅप आधीपासूनच उपलब्ध आहे. यासाठी कंपनीला अतिरिक्त खर्चही सहन करावा लागत होता. त्यामुळे कंपनीने हे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
काय काय बदलणार
l 8 मे नंतर इन्स्टाग्राममधील डीएम फीचर बंद होईल. इन्स्टाग्राममधील मेसेज आता पूर्वीसारखे एन्क्रिप्टेड राहणार नाहीत. इंस्टाग्रामवरील केलेले मेसेज कंपनीसाठी अॅक्सेस करणे शक्य होईल.
l आता इंस्टाग्राम चॅटवरील सुरक्षा पूर्वीपेक्षा कमी होईल.
l आधीचे इन्स्टाग्राम आणि आताचे यात कोणताही बदल दिसणार नाही, परंतु परिणाम होईल.
काय खबरदारी घ्यावी लागेल
l इन्स्टाग्राम यूजर्सने आता चॅटिंग करताना खासगी आणि संवेदनशील गोष्टी शेअर करणे टाळाव्यात.
l कोणतीही महत्त्वाची माहिती शेअर करू नये.
l खासगी आणि संवेदनशील माहिती शेअर करण्यासाठी व्हॉट्सअॅपची निवड करावी.
l व्हॉट्सअॅमध्ये डिफॉल्ट एंड–टू–एंड एन्क्रिप्शन आहे.
l टेलिग्राम सीव्रेट चॅटमध्येही एन्क्रिप्शन फीचर दिले आहे.


























































