
तामीळनाडूतील कुन्नूर येथील एमआय-17 व्ही या लष्कराच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत शहीद झालेल्या जवानांमध्ये लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग यांचाही समावेश होता. त्यांनी आयसीआयसीआय लोम्बार्डकडून एक कोटी रुपये मूल्याचा विमा उतरविलेला होता. त्यांच्या विमा पॉलिसीच्या दाव्याबाबत आयसीआयसीआय लोम्बार्डला सूचना प्राप्त होताच कंपनीने त्याच दिवशी दावापूर्ती केली. लष्कराच्या हेलिकॉप्टरला झालेली हवाई दुर्घटना हे दावापूर्तीचे मुख्य कारण निश्चित करण्यात येऊन तत्काळ दावा मंजूर करण्यात आला.


























































