
राज्यातील काही मतदारसंघांमध्ये अत्यंत चुरशीच्या व अटीतटीच्या लढती होत असून यामध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. नागपूरमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विरोधात भाजपचे माजी आमदार आशीष देशमुख काँग्रेसकडून नशीब अजमावत आहेत तर कोथरूडमध्ये भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात सर्वच प्रमुख विरोधी पक्षांनी मनसेच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. परळीत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे व विधान परिषद विरोधी पक्षनेते धनजंय मुंडे अशी बहीणभावामध्ये थेट लढ होत आहे.
नागपूर दक्षिण-पश्चिम – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (भाजप) विरुद्ध आशीष देशमुख (काँग्रेस)
कोथरूड – चंद्रकांत पाटील (भाजप) विरुद्ध किशोर शिंदे (मनसे-सर्वपक्षीय पाठिंबा)
बारामती – अजित पवार (राष्ट्रवादी) विरुद्ध गोपीचंद पडळकर ( भाजप)
कराड दक्षिण – डॉ. अतुल भोसले (भाजप) विरुद्ध पृथ्वीराज चव्हाण (काँग्रेस)
परळी – पंकजा मुंडे (भाजप) विरुद्ध धनंजय मुंडे (राष्ट्रवादी)
तुळजापूर – राणा जगजीतसिंह (भाजप) विरुद्ध मधुकर चव्हाण (काँग्रेस)
येवला – संभाजी पवार (भाजप) विरुद्ध छगन भुजबळ (राष्ट्रवादी)
जामनेर – गिरीश महाजन (भाजप) विरुद्ध संजय गरुड (राष्ट्रवादी)
फुलंब्री – हरिभाऊ बागडे (भाजप) विरुद्ध कल्याण काळे (काँग्रेस)
भोकर – बापूसाहेब गोरठेकर (भाजप) विरुद्ध अशोक चव्हाण (काँग्रेस)
सातारा – शिवेंद्रराजे भोसले (भाजप) विरुद्ध दीपक पवार (राष्ट्रवादी)
सोलापूर शहर मध्य – प्रणीती शिंदे (काँग्रेस) विरुद्ध दिलीप माने (शिवसेना)
नंदुरबार – डॉ. विजयकुमार गावीत (भाजप) विरुद्ध उदेसिंग पाडवी (काँग्रेस)
इंदापूर – हर्षवर्धन पाटील (भाजप) विरुद्ध दत्ता भरणे (राष्ट्रवादी)
कर्जत-जामखेड – राम शिंदे (भाजप ) विरुद्ध रोहित पवार (राष्ट्रवादी)
वांद्रे पूर्व – विश्वनाथ महाडेश्वर (शिवसेना) विरुद्ध झिशान सिद्दिकी (काँग्रेस)
वांद्रे पश्चिम – आशीष शेलार (भाजप) विरुद्ध आसिफ झकेरिया (काँग्रेस)
जोगेश्वरी पूर्व – रवींद्र वायकर (शिवसेना) विरुद्ध सुनील कुमरे (काँग्रेस)
कणकवली – सतीश सावंत (शिवसेना) विरुद्ध नितेश राणे (भाजप).
सातारा लोकसभा – उदयनराजे भोसले (भाजप) विरुद्ध श्रीनिवास पाटील (राष्ट्रवादी)























































