
थायलंडच्या सिखिओ भागात बुधवारी मोठी दुर्घटना घडली. धावत्या ट्रेनवर बांधकाम क्रेन कोसळल्याने किमान 22 लोकांचा मृत्यू झाला असून 30 हून अधिक जण जखमी झाले आहेत. ही ट्रेन बँकॉकहून थायलंडच्या ईशान्येकडील प्रांताकडे जात असताना ही दुर्घटना घडली. एका हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पावर काम करत असताना थायलंडमधील उबोन रात्चाथानी प्रांताकडे जाणाऱ्या ट्रेनवर ही क्रेन कोसळली. यामुळे ट्रेन रुळावरून घसरली.
मिळालेल्या माहितीनुसार, नाखोन रात्चासिमा प्रांताच्या सिखिओ जिल्ह्यात बुधवारी सकाळी ही घटना घडली. एक मोठी बांधकाम क्रेन कोसळून ट्रेनवर पडल्याने ट्रेन रुळावरून घसरली. यात 22 जणांना आपले प्राण गमवावे लागले तर 30 हून अधिक जण जखमी आहेत, असे नाखोन रात्चासिमा प्रांताचे स्थानिक पोलीस प्रमुख थाचपोन चिन्नवाँग यांनी सांगितले.





























































