
इस्रायली सैन्याने पुन्हा एकदा गाझा पट्टीवर भीषण हवाई हल्ला केला आहे. या हल्ल्यात किमान 81 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर 400 हून अधिक लोक जखमी झाले. मृतांमध्ये महिला आणि मुलांचा समावेश आहे. गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने या हल्ल्याला दुजोरा दिला आहे.
इस्रायली संरक्षण दलांनी गाझाच्या गर्दीच्या निवासी भागात, एक अपार्टमेंट, शाळा, स्टेडियम आणि निर्वासितांच्या तंबूंना लक्ष्य केले. बॉम्बस्फोटानंतर, परिसरात सर्वत्र धूळ, आग आणि मृतदेह दिसत होते.
हमासचा वरिष्ठ नेता ठार
गाझा शहरातील सब्रा भागात इस्रायली हवाई हल्ल्यात हमासचा सर्वोच्च कमांडर हाकेम मोहम्मद इस्सा अल-इस्सा ठार झाला आहे. अल-इस्सा हा 7 ऑक्टोबर 2023 रोजी इस्रायलमध्ये झालेल्या हत्याकांडाचा सूत्रधार होता, दहशतवाद्यांना प्रशिक्षण देत असे आणि हमासच्या लष्करी शाखेच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होता.