
रशियातील दागेस्तान राज्यात हेलिकॉप्टर कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत अन्य दोन जण जखमी झाले असून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये इलेक्ट्रो-मेकॅनिकल प्लांट (KEMZ) च्या कर्मचाऱ्यांसह प्लांटच्या उपमहासंचालकाचा समावेश आहे. अपघाताचे कारण अद्याप समजू शकले नाही.
रशियाचे KA-226 हे हेलिकॉप्टर KEMZ कंपनीच्या सात कर्मचाऱ्यांना घेऊन चालले होते. यादरम्यान कॅस्पियन समुद्राच्या प्रदेशात अची-सु गावाजवळील हेलिकॉप्टर अनियंत्रित झाले. यानंतर हेलिकॉप्टर जमिनीवर आदळून मग समुद्रात कोसळले. यात हेलिकॉप्टरमधील पाच जणांचा मृत्यू झाल तर दोन जण जखमी झाले. अपघात प्रकरणी तपास सुरू आहे. KA-226 हे दोन इंजिन असलेले हेलिकॉप्टर आहे जे सात प्रवाशांना वाहून नेण्यास सक्षम आहे. हे सामान्यतः उंचावरील ऑपरेशन्स आणि कठीण परिस्थितीत वापरले जाते.

























































