फ्रान्सचे पंतप्रधान सेबेस्टियन लेकोर्नू यांचा राजीनामा

फ्रान्सचे पंतप्रधान सेबेस्टियन लेकोर्नू यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. राष्ट्रपती मॅक्रॉन यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. सेबेस्टियन लेकोर्नू यांनी पंतप्रधानपद सांभाळून एक महिना पूर्ण होण्याआधीच पद सोडले आहे. लेकोर्नू यांना सहकारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी सरकार पाडण्याची धमकी दिल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे, असे बोलले जात आहे. लेकोर्नू यांनी रविवारी आपल्या मंत्र्यांची नियुक्ती केली. सोमवारी दुपारी मंत्रिमंडळाची पहिली बैठक होणार होती, परंतु त्याआधीच त्यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला.