गाझाचे युद्ध थांबवण्यासाठी इस्रायलची अट

गाझातील युद्ध थांबवण्यास आम्ही तयार आहोत, पण त्याआधी हमासने शस्त्रे खाली टाकून इस्रायली बंदीवानांना तात्काळ सोडून द्यावे, अशी अट इस्रायलचे परराष्ट्र मंत्री गिदोन सार यांनी घातली आहे. इस्रायलने युद्ध थांबवून गाझा शहर सोडल्यास आम्ही इस्रायली बंदीवानांना सोडू, असे हमासने म्हटले होते. त्याला इस्रायलने हे प्रत्युत्तर दिले आहे. गाझा पट्टीत इस्रायलचे हल्ले सुरूच आहेत.