मोबाईलमधील इंटरनेटची गती कमी झालीय का? वाचा या टिप्स …

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मोबाईलमध्ये इंटरनेट स्पीड जास्त असण्याची नेहमीच गरज असते. कोरोना महामारीमुळे सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये इंटरनेटची गरज वाढली आहे. बरेच जण घरूनच ऑनलाईन काम करतात, अशा वेळी इंटरनेटचा स्पीड कमी झाला की, चिडचिड होते. पण आता चीडचीड आणि वैतागण्याची गरज नाही. काही गोष्टींच्या साहाय्याने इंटरनेटचा स्पीड वाढवणं शक्य आहे. इंटरनेटचा वेग वाढवायचा असेल तर या काही टिप्स अवश्य ट्राय करा –

अॅप्लिकेशन डाऊनलोड आणि वापरावेळी अनेक नको त्या फाईल्सही डाऊनलोड होतात. त्याला कॅशे म्हटलं जातं. कॅशे भरलेला असेल तर इंटरनेटचा स्पीड कमी होऊ शकतो. त्यामुळे वेळोवेळी कॅशे साफ करत राहा. यामुळे फोन आणि इंटरनेट व्यवस्थित चालतं.

इंटरनेटचा स्पीड वाढण्यासाठी Access Point Network म्हणज APNची सेटिंग करणे महत्त्वाचे आहे. एपीएन मॅन्युअली सेट करता येते.

सोशल मिडिया अॅपमुळे मोबाईलमधील इंटरनेटचा स्पीड कमी होऊ शकतो. फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम यासारख्या सोशल मिडिया अॅपमुळे जास्त डेटा वापरला जातो. याकरिता सेटिंगमध्ये जाऊन ऑटो प्ले आणि डाऊनलोड हे ऑप्शन बंद करा. तसेच ब्राउजरमध्ये डेटा सेव मोड हा ऑप्शन सुरू ठेवा. यामुळे इंटरनेटचा स्पीड वाढेल.

इंटरनेट स्लो झाले असेल तर फोनची सेटिंग चेक करा. सेटिंगमध्ये नेटवर्क सेटिंगच्या ऑप्शनवर जाऊन preferred type of network मध्ये 4G किंवा LTE हे पर्याय निवडा.

इंटरनेटचा स्पीड जास्त हवा असेल तर ब्राउझर टेक्स्ट ओन्ली मोडमध्ये ठेवा. गुगल प्ले स्टोअरवरील सर्व ब्राइझर अॅप्समध्ये हे फंक्शन असतातच असे नाही, पण फोनच्या सेटिंगमध्ये तो पर्याय सापडू शकतो. टेक्स्ट ओन्ली मोड सुरू केलं की, ब्राऊझरमध्ये फोटो लोड होणार नाहीत. त्यामुळे इंटरनेटचा स्पीड काही प्रमाणात वाढतो.