मंथन – उपग्रहाद्वारे इंटरनेटचे युग

महेश कोळी

अलीकडेच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान नवीन दूरसंचार विधेयक पारीत करण्यात आले आहे. या विधेयकाने 138 वर्षे जुना भारतीय टेलिग्राफ कायदा बदलण्यात आला आहे. या बदलांनुसार हिंदुस्थानात आता इंटरनेट सॅटेलाईटचा मार्ग खुला झाला आहे. उपग्रहाद्वारे इंटरनेटची संकल्पना नवी नाही. जगप्रसिद्ध अब्जाधीश एलॉन मस्क यांची स्टारलिंक ही कंपनी या स्वरूपाची सेवा सध्या पुरवत आहे. हिंदुस्थानात ही सेवा सुरू झाल्यानंतर स्टारलिंकबरोबरच जिओ, एअरटेल आणि जेफ बेजोस यांची ब्लू ओरिजिन या चार कंपन्या प्रमुख दावेदार असणार आहेत. ही नेमकी संकल्पना काय आहे? त्यातील तंत्रज्ञान कसे काम करते? या इंटरनेट सेवेमुळे काय साधले जाणार आहे? या मुद्दय़ांचा घेतलेला वेध.

इंटरनेट हा एकविसाव्या शतकातील केवळ परवलीचा शब्दच नसून जीवन जगण्यातील प्रािढयेतील अविभाज्य घटक बनला आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या युगाचा सबंध डोलारा इंटरनेटच्या पायावर उभा आहे. हिंदुस्थानसारख्या देशामध्ये डिजिटलायझेशनचा पसारा ज्या गतिमानतेने वाढत आहे, त्याला तितक्याच वेगवान आणि अखंडित इंटरनेटचा आधार गरजेचा आहे. शिक्षण, आरोग्य, कृषी, उद्योग जगत, अंतराळ विश्व, सेवा क्षेत्र यांसह सर्व क्षेत्रांमध्ये इंटरनेटने केवळ आमूलाग्र बदलच घडवून आणलेले नाहीत, तर त्यांचा कायापालट केलेला आहे. तळागाळापर्यंत सरकारच्या विकास योजनांचा लाभ मिळतो की नाही, याबाबत मतमतांतरे असू शकतील; पण मोबाइल, स्मार्टफोनच्या माध्यमातून इंटरनेट सेवा मात्र दुर्गम वाडय़ावस्त्यांवरील नागरिकांपर्यंत पोहोचली आहे. जगातील सर्वाधिक लोकसंख्या असणाऱया सुमारे 137 कोटींच्या हिंदुस्थानात जवळपास 90 कोटी लोकांजवळ इंटरनेट अॅक्सेस असल्याचे एका पाहणीतून दिसून आले आहे. येणाऱया काळात हा आकडा 100 कोटींपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. देशात 760 दशलक्षाहून अधिक सािढय इंटरनेट वापरकर्ते आहेत. 2025 पर्यंत ही संख्या 900 दशलक्षापर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.  विशेष म्हणजे सािढय इंटरनेट वापरकर्त्यांपैकी जवळपास 400 दशलक्ष लोकसंख्या ही ग्रामीण हिंदुस्थानातील आहे. 2025 पर्यंत हिंदुस्थानातील इंटरनेट वापरकर्त्यांपैकी 56 टक्के युजर्स ग्रामीण हिंदुस्थानातील असतील.

उपरोक्त आकडेवारी आशादायक असली तरी त्यामध्ये एक कळीचा मुद्दा अनुस्यूत आहे, तो म्हणजे हे सर्व डिजिटल ािढयाकलाप सुव्यवस्थितपणे चालण्यासाठी इंटरनेट सेवेची गुणवत्ता आणि अखंडितपणा अबाधित ठेवून त्याचा वेग वाढवत जाणे. अन्यथा कल्पना करा की, उद्या जर इंटरनेट सेवाच काही कारणाने खंडित झाली तर…?  जून 2021 मध्ये जगभरातील अनेक भागांतील इंटरनेट सेवा काही काळासाठी खंडित झाली होती. त्याचा खूप मोठा फटका बसल्याची नोंद आहे. आपल्याकडे दंगलग्रस्त भागांमध्ये इंटरनेट सेवा बंद केल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. कश्मीरमध्ये हे प्रकार सर्रास पाहायला मिळाले आहेत, पण इंटरनेट सेवा खंडित होण्याचे अशा प्रकारचे संभाव्य धोके लक्षात घेऊन त्या परिस्थितीचा सामना करण्यासाठीची तयारी आता हिंदुस्थानने सुरू केली आहे. यासाठी उपग्रहाद्वारे इंटरनेट सेवेला आता परवानगी देण्यात आली आहे. ही संकल्पना हिंदुस्थानसाठी नवी असली तरी जगासाठी नाही. जगातील अब्जाधीशांच्या दुनियेतले मोठे नाव असणारे एलॉन मस्क यांची स्टारलिंक ही कंपनी उपग्रहाधारित इंटरनेट सेवा देण्याचे काम अनेक  वर्षांपासून करत आहे. दोन वर्षांपूर्वी जेव्हा रशियाने पोनवर हल्ला केला तेव्हा तेथील इंटरनेट सेवा विस्कळीत करण्यात आली होती. रशियाने सायबर हल्ले करून पोनचे पंतप्रधान झेलेन्स्की यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता. त्या वेळी एलॉन मस्क यांनी त्यांना स्टारलिंकतर्फे सॅटेलाईट इंटरनेट सेवा पुरवली होती, असे सांगितले जाते.

संपूर्ण जगामध्ये फायबर ऑप्टिक वायरद्वारे इंटरनेट समुद्रतळापासून आपल्यापर्यंत पोहोचवले जाते, परंतु सॅटेलाईट इंटरनेटची प्रािढया पूर्णत भिन्न आहे. एलॉन मस्क यांचा स्टारलिंक हा एक सॅटेलाईट इंटरनेट प्रोजेक्ट असून त्यामध्ये सॅटेलाईटच्या मदतीने इंटरनेट सर्व्हिस दिली जाते. यासाठी कुठल्याही ग्राऊंड इन्फ्रास्ट्रक्चरची गरज पडत नाही. कुठलेही टॉवर किंवा वायर तसेच इतर कुठलेही माध्यम नसताना लेसर बीम वापरून डेटा ट्रान्सफर केला जातो. यासाठी लोअर ऑर्बिट सॅटेलाईटचा वापर केला जातो. या लोअर ऑर्बिट सॅटेलाईटचा लेटन्सी रेट म्हणजे एका पाइंटपासून दुसऱया पाइंटपर्यंत डेटा पोहोचवण्यासाठी लागणारा वेळ खूपच कमी असतो. त्यामुळे ऑनलाइन बफरिंग, गेमिंग आणि व्हिडीओ कॉलिंगची क्वालिटी कित्येक पटीने चांगली होते. जून 2021 पर्यंत पृथ्वीभोवती सािढय असलेल्या स्टारलिंक सॅटेलाईटची संख्या 1,500 पेक्षा जास्त होती. सॅटेलाईट इंटरनेट जगाच्या कोणत्याही कोपऱयातून वापरता येऊ शकते. अगदी दुर्गम भागातदेखील ही इंटरनेट सेवा मिळवता येते. अभ्यासकांच्या मते, या इंटरनेट सेवेसाठी आकाश निरभ्र असले पाहिजे. मुसळधार पाऊस किंवा जोरदार वारा कनेक्शनमध्ये व्यत्यय आणू शकतो.

सध्या आपण डिशच्या माध्यमातून ज्याप्रमाणे विविध उपग्रह वाहिन्यांचा आस्वाद टीव्हीच्या छोटय़ा पडद्यावर घेत आहोत तसेच काहीसे तंत्रज्ञान  उपग्रहाधारित इंटरनेट सेवेमध्ये वापरले जाते. यासाठीचे सिग्नल्स हे अंतराळातून येत असल्यामुळे ग्रामीण, दुर्गम भागासाठी जिथे इंटरनेट सेवा पोहोचलेली नाही किंवा वेग कमी आहे, अशा भागांसाठी ही सेवा वरदान ठरणारी आहे.

अलीकडेच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान नवीन दूरसंचार विधेयक पारीत करण्यात आले आहे. या विधेयकाने 138 वर्षे जुना भारतीय टेलिग्राफ कायदा बदलण्यात आला आहे. या बदलांनुसार हिंदुस्थानात आता इंटरनेट सॅटेलाईटचा मार्ग खुला झाला आहे. यासाठीच्या स्पेक्ट्रमची पी करण्यात येणार आहे. त्याची तारीख अद्याप जाहीर झालेली नसली तरी 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर त्यासंबंधीची सूचना जारी केली जाऊ शकते. सध्या या क्षेत्रात चार प्रमुख कंपन्या दावेदार आहेत. यामध्ये सुनील मित्तल यांची भारती एअरटेल, मुकेश अंबानींची रिलायन्स जिओ, एलॉन मस्कची स्टारलिंक आणि जेफ बेजोस यांची ब्लू ओरिजिन यांचा समावेश आहे. सॅटेलाईट इंटरनेटचा वापर समुद्रामध्ये मार्पामण करण्यासाठी तसेच विमान प्रवासादरम्यान केला जातो. कारण समुद्रामध्ये व हवाई मार्गामध्ये टॉवरच्या माध्यमातून इंटरनेट पोहोचवता येत नाही. .

सॅटेलाईट इंटरनेटचे युग ही एक ाढांती मानली जात असली आणि आज या क्षेत्रातील कंपन्या त्यामध्ये अधिक स्वारस्य घेत असल्या तरी त्यामध्ये आव्हानेही आहेत. सॅटेलाईट अवकाशामध्ये प्रक्षेपण करणे, त्याच्या नियोजित ठिकाणी पाठवणे  हे काम खूप खर्चिक आहे. त्यामुळे यामध्ये अद्याप नावीन्यपूर्ण संशोधन होणे गरजेचे आहे. उपलब्ध माहितीनुसार सध्या वायरद्वारे मिळणारी इंटरनेट सेवा 30 ते 40 मिली सेकंदांमध्ये  आपल्यापर्यंत इंटरनेट पोहोचवते, परंतु सॅटेलाईट इंटरनेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी 600 ते 800 मिली सेकंदपर्यंत वेळ लागू शकतो. उपग्रह उंचीवर स्थिरावले असल्याने एवढा वेळ लागू शकतो. ही इंटरनेट सेवा कुठेही उपलब्ध होणारी असली तरी त्यासाठीची शुल्क रचना परवडणारी असेल का? हे पाहणे गरजेचे आहे. वर्ल्डवाईड मोबाइल डेटा प्रायसिंग 2022 च्या यादीनुसार इंटरनेट डेटाचे सर्वात कमी दर असणाऱया जागतिक ाढमवारीत हिंदुस्थान पाचव्या स्थानावर आहे. या पार्श्वभूमीवर सॅटेलाईट इंटरनेट सेवेचे शुल्क किती असेल हे पाहावे लागेल. फाईव्ह-जी तंत्रज्ञानाचा प्रसार होत चालल्यानंतर हिंदुस्थान आता ‘सिक्स-जी’ची तयारीही करत आहे. अशा स्थितीमध्ये हे नवे दालन खुले करण्याने काय साध्य होणार? हे येणाऱया काळात पाहावे लागेल.

शेवटचा मुद्दा म्हणजे, येणारा काळ हा आर्टिफिशल इंटेलिजन्स, ऑग्मेंटेड रिअॅलिटी, इंटरनेट ऑफ थिंग्ज यांच्या वापराचा आहे. आज याचा प्रसार वेगाने होत आहे. यासाठी वेगवान इंटरनेट सेवा गरजेची आहे, परंतु इंटरनेटच्या वापरामुळे होणारे धोकेही आता लक्षात येऊ लागले आहेत. आर्थिक ािढयाकलापांसाठी इंटरनेट हे वरदान ठरणारे असले तरी वैयक्तिक आयुष्यामध्ये त्याचा अतिवापर अनेक समस्यांना जन्म घालणारा ठरत आहे. अशा स्थितीत हे नवे अवकाश खुले होत आहे. त्यातून उद्याच्या भविष्यात नेमकी कशा स्वरूपाची ाढांती घडते हे पाहणे रंजक ठरेल.

(लेखक संगणक अभियंता आहेत)