मोदीच्या बहिणीविरोधात रेड कॉर्नर नोटीस

13

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

पंजाब नॅशनल बँकेत 14 हजार कोटी रुपयांचा घोटाळा करून पसार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदी याची बहीण पूर्वी मोदीविरोधात इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे. या आधी नीरव मोदीविरोधातही अशी नोटीस जारी करण्यात आली आहा. रेड कॉर्नर नोटीस जारी केल्यानंतर इतर देश त्यांच्याविषयी सतर्क होतील आणि त्यांच्या एका देशातून दुसऱ्या देशात पळून जाण्यावर निर्बंधही घातला जाईल.

purvi-modi

एएनआयने यासंदर्भातील कागदपत्र ट्वीट करून ही माहिती दिली आहे. हिंदुस्थानच्या बँकांना बुडवणाऱ्या या कुटुबीयांविरोधात कडक पाऊले उचलले जातील अशी माहिती सरकार आधीच दिली होती. सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीने इंटरपोलकडे विनंती केल्यानंतर ही नोटीस बजावण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या