फर्स्ट टेक : जिद्द मेहनत आत्मविश्वास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> स्वरा सावंत

सर्वसामान्य कुटूंबातून इंडस्ट्रीत आलेला हा चेहरा… या क्षेत्रात कोणताही बॅकअप नाही… तरी आपली स्वतःची जागा याने निर्माण केलीच. जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वास… इतपंच बरोबर घेऊन तो आला… त्याने परिस्थितीचा बाऊ न करता तो लढला… आणि प्रबळ आत्मविश्वासाने अगदी पाय रोवून तो या क्षेत्रात धैर्याने उभा राहिला… आणि जिंकला. आपल्या यशस्वीतेचे गुपित उलगडताना स्ट्रगल कुणाला चुकला नाही… सांगतोय अभिनेता विवेक सांगळे.

गिरणगावातील सर्वसामान्य कुटुंबातून सिने इंडस्ट्रीत आपलं नशीब आजमावायला आलेल्या अनेकांच्या गर्दीत मीही होतो. सुरुवात धडपडीची होती. अपघातानेच या क्षेत्रात आलो. कुठे जायचंय, कोणाला भेटायचं मुळात सुरुवात कुठून करायची हे माहीत नसताना अंधेरी वेस्टला असलेल्या क्रिएटिंग पॅरेक्टर्स संस्थेत पोहोचलो. आपल्याला अॅक्टरच व्हायचंय असं काही ठरलं नव्हतं, पण मग कुठलीही गोष्ट शिकल्याशिवाय त्याला पूर्णत्व मिळत नाही, या मताचा मी असल्याने ऑक्टिंगचे धडे गिरवायला सुरुवात केली आणि मग कलाकार होण्याच्या दिशेने पाऊल आणि मन दोन्हीही वळायला लागले.

काम कसं मिळवायचं? या मानसिक स्ट्रगलमध्ये असताना प्रवासात भेटणारे बरेचजण गाईड करायचे. पेपरमधल्या जाहिराती वाचून…मित्रांकडून इकडे हे सुरू आहे, तिथे जा… तिकडे ते काम आहे तिथे पळा, असं सगळं सुरू होतं. अशा पळापळीत 2011-12 च्या दरम्यान ‘गुंतता हृदय हे’ ही मालिका सुरू झाली. या मालिकेत पासिंगचे काम मिळाले. त्यानंतर एक एक पॅरेक्टर रोल मिळायला सुरुवात झाली. एका एका लाईन्ससाठी रोल मिळू लागला, गर्दीत ओळख मिळू लागली. पण खरी ओळख मिळाली ती 2014 मध्ये आलेल्या आयरिस प्रॉडक्शनच्या ‘देवयानी’ मालिकेमुळे.

आविष्कारचे नाटक, विविध कामांसाठी ऑडिशन देत असताना देवयानीची स्क्रीन टेस्ट सुरू झाली. कांदिवलीच्या बसराज स्टुडिओमध्ये 200 जणांच्या गर्दीत ऑडिशन दिली. चार-पाच वेळा लूकटेस्ट दिल्या… आणि माझी निगेटिव्ह रोलसाठी निवड झाली. या मालिकेचा प्रोमो शूट करताना खऱया अर्थाने पॅमेराचा फर्स्ट टेक अनुभवला. पॅमेरा फेस करताना आलेले दडपण, व्हिज्युअल करण्याचा अनुभव, पहिल्यांदा मिळालेली व्हॅनिटी.. सगळं काही नवं नवं होतं. सलग दोन वर्षे हा प्रोजेक्ट सुरू होता. यानंतर लव्ह लग्न लोचा, आम्ही दोघी, काळूबाई, भाग्य दिले तू मला असा प्रवास सुरू झाला.

पैसे थोडेच, पण महत्त्वाकांक्षा मोठीच!

प्रत्येक कलाकाराला सुरुवातीला काम मिळवताना स्वतःला प्रेझेंट करावं लागतं. घरातून सगळ्या गोष्टींना पाठिंबा असला तरी त्यावेळी पह्टोशूट करून घेणं, पोर्टपहलिओ करणं खूपच आवाक्याबाहेर होतं. लिमिटेड पैसे होते, पण महत्त्वाकांक्षा मोठी होती. त्यामुळे बजेट गोळा करण्यापासून सुरुवात होती. अखेर या प्रवासात अनेक मित्र भेटले… त्यांची या ना त्या कारणाने मदत झाली आणि अखेर माझा पोर्टपहलिओ आकाराला आला.

फोकस हलवणारा बटरफ्लाय नकोच!

बटरफ्लाय… म्हणजे पोटात गोळा येणे… असं म्हणतात की पोटात गोळा आलेला चांगला. पण मी अगदी या विरोधात आहे. पह्कस हलवणारा बटरफ्लाय मला नकोच. कोणतेही काम सुरू करताना पोटात गोळा आला किंवा भीती वाटली की ती अर्धाअधिक आपला कॉन्फिडन्स घालवते. मग लक्ष कामावर नसते तर ती भीती कशी घालवू, याकडे असते. म्हणून बॉस..! मला तरी हा बटरफ्लाय नकोच.

निगेटिव्ह रोल आणि यशाचे शिखर

करिअरच्या सुरुवातीलाच निगेटिव्ह रोल मिळणं… म्हणजे एक मोठं धाडस होतं. पण इतिहास सांगतो. अभिनेता शाहरूख खानला करिअरच्या स्टार्टअप पॉइंटला ‘डर’ या सिनेमात निगेटीव्ह रोलसाठी कास्टिंग केले होते. पण या संधीचे त्याने सोने केले. भूमिका कोणतीही असो, नायक वा खलनायक असो पिंवा लहान वा मोठी असो, आपण अतिशय प्रामाणिकपणे, मेहनतीने आपले काम केले पाहिजे. नवीन कलाकारांनी याचे कुठेही दडपण ठेवू नये, असा सल्ला दैनिक ‘सामना’शी बोलताना विवेकने दिला.