रंगपट – नाटकात आयुष्य बदलून टाकण्याची ताकद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> शब्दांकन – राज चिंचणकर

एखाद्या नाटकाचा इतका खोलवर परिणाम होऊन आपण एखाद्या व्यक्तीचे आयुष्य बदलू शकतो, हा अनुभव माझ्यासाठी खूप मोलाचा होता… सांगत आहेत दिग्दर्शक, अभिनेते व निर्माते अजित भुरे.

नाटक आपल्याला खूप काही देऊन जाते. मी दिग्दर्शित केलेल्या ‘सेल्फी’ नाटकाचे जगभर 125 पेक्षा अधिक प्रयोग झाले. त्यातले 8 प्रयोग अमेरिकेतील मंडळांनी तिथल्या निरनिराळय़ा शहरांत आयोजित केले होते. आपण नेहमी दुसऱयाला काय वाटेल, याचा विचार करत जगतो. विशेषतः आपल्या देशातील स्त्र्ाया या नवऱयाच्या, मुलाबाळांच्या आनंदाचा विचार करतात. स्वतःचा आनंद कशात आहे, तसेच त्या सेल्फरेट्रोस्पेक्शनमध्ये स्वतःला शोधणे ही ‘सेल्फी’ या नाटकाची थीम होती.

अमेरिकेतल्या शहरांत आम्ही प्रत्येक प्रयोगानंतर तिथल्या प्रेक्षकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत होतो. अशाच एका शहरातल्या प्रयोगानंतर प्रेक्षागृहातील एक महिला उभी राहिली आणि म्हणाली, ‘‘हे नाटक मला खूप शिकवून गेले. माझ्या मुलीने काही वर्षांपूर्वी एक निर्णय तिच्या जोडीदाराबाबत घेतला, जो मला पटला नव्हता. त्या नाराजीतून मी तिच्याबद्दल, तिच्या आयुष्याबद्दल समाजात बोलायला टाळत होते, पण हे नाटक पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आले की, मी तिच्या आनंदाचा विचार न करता माझ्या आजूबाजूच्या लोकांचा जास्त विचार करत होते. त्यांचा विचार न करता माझ्या मुलीचा आनंद मी समजून घेतला पाहिजे, हे माझ्या लक्षात आले. आता मी तिच्याबरोबर ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेत आहे.’’ एखाद्या नाटकाचा इतका खोलवर परिणाम होऊन आपण एखाद्या व्यक्तीचे आयुष्य बदलू शकतो हा अनुभव माझ्यासाङ्गी खूपच मोलाचा होता.

एकदा आमच्या ‘काटकोन त्रिकोण’ नाटकाचा बोरिवलीत प्रयोग होता. मोहन आगाशे त्या नाटकात एक महत्त्वाची भूमिका करायचे. त्या दिवशी ते बोरिवलीच्या प्रयोगाला आले तेच अत्यंत क्षीण अवस्थेत! त्यांची तब्येत त्या दिवशी ठीक नव्हती. नाटय़गृहावर प्रेक्षक तर मोङ्गय़ा संख्येने आले होते. त्यामुळे आम्ही प्रयोग सुरू केला. जसजसा प्रयोग रंगू लागला, तसतशी मोहन आगाशेंची तब्येत जास्त खालावू लागली. मध्यंतरानंतर त्यांना खूपच त्रास होऊ लागला, पण तरीही ते जिद्दीने उभे होते. तब्येतीवर होऊ शकणाऱया परिणामांची पर्वा न करता, नाटकाचा परिणाम यत्किंचितही कमी होणार नाही यासाङ्गी जीव तोडून ते आणि इतर सगळेच प्रयत्नशील होते. आता एक शेवटचा प्रवेश बाकी होता, पण त्यांना उभे राहणे अगदीच अशक्य झाले. आम्ही नाटक थांबवले आणि हात जोडून प्रेक्षकांना विनंती केली की, ‘‘नाटकाची आता शेवटची पाच मिनिटे राहिली आहेत, पण आम्ही काहीच करू शकत नाही. तुम्ही पुढच्या प्रयोगाला येऊ शकता. आम्ही काहीतरी ऍडजेस्टमेंट करू.’’ तेव्हा प्रेक्षकांनी आम्हाला सांगितले की, ‘‘तुम्ही उरलेला प्रवेश फक्त बसून वाचून दाखवला तरी चालेल. आम्ही तुमची अडचण समजू शकतो.’’ परिणामी, संदेश कुलकर्णी आणि केतकी थत्ते यांनी केवळ वाचन करून तो शेवटचा प्रवेश सादर केला. प्रेक्षकांनी टाळय़ा वाजवून आमचे कौतुक केले. हा विलक्षण प्रसंग आम्ही कुणीच विसरू शकत नाही. मराङ्गी प्रेक्षकांइतका सुजाण रसिक आम्हाला मिळणे हे आम्हा सर्व नाटकवाल्यांचे भाग्यच म्हणायला हवे.