विशेष मुलाखत – युवा पिढीने ठरवले तर कोरोना संपेल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भारत बायोटेकने बनकलेली कोरोना प्रतिबंधक कोव्हॅक्सीन लस 15 ऑगस्टच्या मुहूर्तावर ती बाजारात उपलब्ध होणार आहे. त्यावर एड्स सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष व औषध क्षेत्रातील जाणकार डॉ. आय. एस. गिलाडा यांच्याशी साधलेला संवाद. लसी येतील पण युवा पिढीने ठरवले तरच कोरोना संपवता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ही देशातील पहिली कोरोना प्रतिबंधक लस ठरणार आहे?
– हो. पण ती लस प्रत्येकाला परवडणारी असायला हवी पुरेशा संख्येमध्ये डोस बनवायला हवेत. लस आली तर पहिली कोणत्या घटकांना उपलब्ध करणार हे ठरवले पाहिजे. या एकूण प्रक्रियेमध्ये सरकार, खाजगी क्षेत्र आणि स्वयंसेवी व सामाजिक संघटनांना सामावून घेतले पाहिजे आणि विशेष म्हणजे देशातील प्रत्येकाला ही लस मिळेपर्यंत तिच्या निर्यातीला मनाई केली पाहिजे.

खरंच इतक्या लवकर लस उपलब्ध होईल?
– लस बनकल्यानंतर तिच्या चाचण्या केल्या जातात. या सर्व प्रक्रियेला किमान सहा महिने ते एक वर्ष जाते. संकटाच्या काळात ही प्रक्रिया थोडी वेगवान असते.

ही लस कोरोना झालेल्या रुग्णांसाठी आहे की कोरोना होऊ नये म्हणून आधी देण्यासाठी आहे?
– भारत बायोटेकने बनवलेली कोव्हॅक्सीन लस ही प्रिव्हेंन्टीव्ह व्हॅक्सीन म्हणजेच कोरोना होण्यापूर्वी देण्याची आहे.

सध्या कोरोनाच्या स्थितीबद्दल तुमचे काय मत आहे?
– सध्या आपण फॅबिपीराकीर, रेमेडेसिकीर, टोलिसीझुमॅब ही औषधे रुग्णांना देत आहोत. अनेकांना वाचवण्यात आपण यशस्वी होत आहोत. पण एकही रुग्ण दगावू नये या दिशेने आपल्याला पावले उचलण्याची गरज आहे.

लस आल्यानंतर कोरोना संपणार का?
– कोरोना इतक्या लवकर जाणार नाही. कारण अजूनही आपण देशातील प्रत्येकाची चाचणी केलेली नाही. अनेकांमध्ये तो लक्षणे न दाखवताही त्यांच्या शरीरात आश्रय घेऊन आहे आणि त्यांच्यापासून इतरांना त्याची लागण होत आहे. युवा पीढीने ठरवले तर कोरोना संपकता येईल. कोरोना हा युवा पीढीकर जास्त हल्ला करत आहे. कारण तरूण मंडळी सोशल डिस्टिंन्सगसारख्या सुरक्षा उपायांचे पालन करताना दिसत नाही. बरेच तरुण बाईकवरून विनाकारण फिरत असतात. वयोवृद्ध व्यक्ती सर्व घरांमध्येच आहेत. बाहेर आहेत ते तरुण. एचआयव्हीसारखा आजार आपण युवा पीढीमुळेच नियंत्रणात आणू शकलो. आता कोरोनावर नियंत्रण मिळवणेही त्यांच्याच हातात आहे.