कलेला मोठं झालेलं बघायचं आहे

>> शुभांगी बागडे

अर्धवटराव आणि आवडाबाई या बाहुल्यांना बोलतं करणारे शब्दभ्रमकार रामदास पाध्ये यांचं नाव बोलक्या बाहुल्यांच्या जगात आदराने घेतलं जातं. जगभर ख्याती मिळवलेले अर्धवटरावकाही दिवसांतच वयाची शंभरी ओलांडत आहेत. नुकतेच रामदास पाध्ये आणि त्यांचं बोलक्या बाहुल्यांचं कुटुंब रशियातील पपेट्री कार्निव्हलहून आले. जगातील अत्यंत प्रतिष्ठत अशा रशियाच्या येकाटीनबर्ग शहरात भरलेल्या या पपेट्री कार्निक्हलमध्ये रामदास पाध्ये एकमेव शब्दभ्रमकार ठरले. या वर्ल्ड पपेट्री कार्निव्हलचा अनुभव जाणून घेत त्यांच्याशी केलेली बातचित.

रशियातील या वर्ल्ड पपेट्री कार्निव्हलचं स्वरूप नेमकं कसं होतं?

जगभरातील बाहुल्यांचा हा उत्सव होता. यात कळसूत्री बाहुल्या, काठी बाहुल्या, फिंगर पपेट्स असे अनेक प्रकार आहेत. यात बोलक्या बाहुल्यांच्या कार्यक्रमाचा प्रकार अगदी वेगळा असतो. या उत्सवाची शंभरी आणि आमच्या अर्धवटरावांची शंभरी असा योग या कार्निव्हलमुळे जुळून आला. कलेला वेगळी उंची देण्यातला वाटा जाणून, तुमच्या कामाचं महत्त्व, त्यातलं योगदान जाणून या कार्निव्हलमध्ये निवड केली जाते. आमची या कार्निव्हलमध्ये निवड झाल्याचं 8-10 महिन्यांपूर्वी कळवण्यात आले. या फेस्टिव्हलसाठी अनेक देशांतून पपेट कलाकार आले होते. विशेष म्हणजे याचे नियोजन व संपूर्ण जबाबदारी तिथल्या शासनाने उचलली होती.

यातलं तुमचं सादरीकरण कसं होतं?

यात वेगवेगळे कार्यक्रम, प्रकार पाहता आले. यातील आमचा कार्यक्रम अनेक अर्थांनी वेगळा ठरला. आमच्या कथेचा आशय हा बोलक्या बाहुल्यांच्या जगातला प्रवास सांगणारा होता. यात कळसूत्री बाहुल्यांपासूनच जग मांडताना आमचा प्रवास कसा झाला हेही मांडलं, जे तिथल्या प्रेक्षकांना खूप आवडलं. साधारणतŠ बोलक्या बाहुल्या वा इतर पपेट्सच्या माध्यमातून लहान मुलांच्या गोष्टी, कथानकं रचून सादरीकरण केलं जातं. मात्र जागतिक पातळीवर प्रतिनिधित्व करताना आम्ही बोलकी बाहुली आणि त्याच्यातून आधुनिक पद्धतीतून आम्ही जे प्रकार आतापर्यंत सादर केले त्याचं रूप यातून आम्ही दर्शवलं. या कार्निव्हलला जगभरातून लोक येणार होते. त्यामुळे त्यांना कळेल अशा भाषेत सादरीकरण करणं गरजेचं होतं. त्याबरोबरच तिथे रशियन भाषा जास्त प्रमाणात बोलली जाते. म्हणून रशियन भाषेत कार्यक्रम सादर केले. यासाठी मुलगा सत्यजित ही भाषा शिकला. त्याचा सराव केला. रशियामध्ये त्यांच्या लोककथा, जातककथा यांना सांस्कृतिक महत्त्व आहे. तिथे कॅथ्युषा नावाचं लोकसंगीत खूप प्रसिद्ध आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा अमाप प्रतिसाद लाभला.

तिथे तुम्हाला कसा प्रतिसाद लाभला?

केरळातील पावा कथकली खूप प्रसिद्ध आहे. भारतीय हँडपपेट कसं असतं हे दाखवताना त्या रशियन गाण्यावर सादर केल्या. याची कोरिओग्राफीदेखील रशियन पद्धतीची होती. त्यामुळे ते लोकांना खूप आवडलं. रशियामधील राज कपूरची लोकप्रियता जाणून त्यांच्या गाण्यावर कळसूत्री बाहुल्यांचा कार्यक्रम सादर केला. हे सगळं तिथल्या प्रेक्षकांना खूप आवडलं. या कार्यक्रमला अनेक ग्रुप आले होते. ज्यात काही ग्रुपमध्ये 50 पेक्षाही अधिक सदस्य होते. यात संपूर्ण कुटुंब कोणाचंच नव्हतं. मात्र आमचं वैशिष्टय़ हे होतं की, आमचं संपूर्ण कुटुंब हे कार्यक्रम सादर करत होतं. अगदी आमच्या 15 महिन्यांच्या नातीलाही सामावून घेणारा कार्यक्रम आम्ही रचला होता. एका घरातील माणसं समरस होऊन कला सादर करतात याचं तिथल्या लोकांना खूप अप्रूप वाटलं. जगाला आपली कला सादर करताना ती विशिष्ट पद्धतीनेच सादर केली पाहिजे. हे जाणून ज्या ज्या देशात आम्ही जातो तिथली भाषा, संस्कृती याला प्राधान्य देत कार्यक्रम सादर करतो.

आपल्याकडे याबाबत कसे वातावरण आहे?

सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे कलेला महत्त्व देणं. आपल्याकडे पपेट वा बाहुली या कलेला आपल्याकडे महत्त्व दिले जात नाही. महत्त्वाचं म्हणजे आपलं शासन यासाठी फार उत्सुक नाही. रशियामध्ये शासनाकडून पपेट कलाकारांना कायमस्वरूपी मानधन देण्यात येते. कार्यक्रम सादर करण्यासाठी आर्थिक साहाय्य दिले जाते. तिथे खास पपेट थिएटरही उभारण्यात आली आहेत. या कलेचा प्रसार व प्रसिद्धी व्हावी याकरिता वेगवेगळ्या मार्गांनी प्रयत्न केले जातात. बाहुली कलेला अशी राजमान्यता देणारे अनेक देश आहेत; परंतु आपल्याकडे मात्र याबाबत अनास्था दिसून येते.

लोकांचा याबाबतचा दृष्टिकोन बदलला आहे का?

बाहेरच्या देशांमध्ये म्हणाल तर त्यांच्याकडे सुरुवातीपासूनच बाहुली कलेकडे आदराने पाहिले जाते. तिचे जतन, संवर्धन व्हावे, पुढच्या पिढीमध्ये ही कला रुजावी यासाठी प्रयत्न केले जातात. आपल्याकडेही या कलेबाबत दृष्टिकोन काहीसा बदलला आहे. परंतु याचं प्रमाण नगण्यच म्हणावं लागेल. बाहेरच्या देशात या कलेला मान, प्रतिष्ठा आहे. बोलक्या बाहुल्यांसाठी आम्हाला ओळखलं जातं, परंतु अजूनही पपेट म्हणजे लहान मुलांचं मनोरंजन करणारी कला याच दृष्टीने पाहिले जातं. आम्ही जे सादर करतो वा या कलेसाठी जे प्रयत्न करतो ते संपूर्णतŠ वैयक्तिक पातळीवर असतात. यामुळेच यातील यश पाहता स्वतŠसाठी म्हणून मी समाधानी असलो तरी एक कलाकार म्हणून नाही. ही कला इतरांनी आत्मसात करावी, यासाठी तरुणांनी पुढे यावं, या कलेसाठी काहीतरी भरीव करावं ही अनेक दिवसांची इच्छा आहे. वैयक्तिक पातळीवर आम्ही याची सुरुवात केली आहे. परंतु अशा अनेकांपर्यंत पोहोचायचं तर त्यासाठी मोठी यंत्रणा लागेल आणि शासनाकडून याबाबतीत कोणतेच सहकार्य मिळत नाही. यामुळे आमचेही प्रयत्न तोकडे पडत आहेत.

n तुमच्या घरातील कलेचा वारसा आणि अर्धवटरावांबद्दल थोडंसं सांगा

माझे कडील प्रो. यशवंत पाध्ये हे एक उत्तम जादूगार, पेटीकादक होते. ते नाटकातसुद्धा कामे करीत. त्या काळी त्यांनी कॉल टेरी नाकाच्या शब्दभ्रमकाराचे कार्यक्रम पाहिले आणि या कलेचे केड त्यांच्या डोक्यात शिरले. 1920 मध्ये त्यांनी ‘अर्धकटराक’ हे पात्र साकारले. त्यानंतर अर्धवटरावाची पत्नी ‘आकडाबाई’ क त्यांची दोन इरसाल मुलं रामू क गंपू असे चौकोनी कुटुंब त्यांनी तयार केले. त्या वेळी अनेक किनोदी कार्यक्रम त्यांनी केले. ते लोकप्रियही झाले. महत्त्वाचं म्हणजे ते या कार्यक्रमासाठी पैसे घेत नसत. आपली कला किकायची नाही हे त्यांचे तत्त्क होतं. याच काळात मी या कलेचा रियाज सुरू केला. अकरा कर्षे मी हा रियाज केला. तोपर्यंत मला कार्यक्रम करण्याची परकानगी त्यांनी दिली नाही. 1 मे 1967 साली मी कडिलांच्या एका कार्यक्रमात माझा 5 मिनिटांचा छोटा कार्यक्रम सादर केला. आपला अर्धवटराव आता कायम बोलत राहील याची वडिलांना खात्री पटली आणि एका आठवडय़ानंतर त्यांचं निधन झालं. जणू त्यांनी हक्काने कलेचा वारसा माझ्याकडे दिला आणि निघून गेले. या भावनेनेच या कलेला मी जपलं आहे. शब्दभ्रमकार ही माझी ओळख त्यांच्यामुळे, अर्धवटरावामुळे बनली आहे आणि म्हणूनच या कलेला मोठं झाल्याचं बघणं हे माझं स्वप्न आहे.

–  shubhabagde0101@gmail.com