
सामना ऑनलाईन । मुंबई
पालघर जिल्ह्य़ातील युवा सेनेच्या पदांकरिता नेमणुका करण्यात येत असून युवा सेनेच्या सर्व पदांकरिता मुलाखती घेण्यात येणार आहेत. युवा सेनेचा पदाधिकारी होण्यास इच्छुक असणाऱयांनी युवा सेनेचा सक्रिय सदस्य असणे आवश्यक आहे.
गुरुवार, २ ऑगस्ट २०१८ रोजी पालघर, डहाणू, विक्रमगड विधानसभा मतदारसंघासाठी सकाळी ११.३० वाजता जिल्हा मध्यवर्ती कार्यालय, टर्निंग पॉईंट कचेरी, नवली फाटक रोड, रजिस्ट्रेशन ऑफिसजवळ, पालघर पश्चिम येथे मुलाखती घेतल्या जातील तर दुपारी ३.३० वाजता वसई, नालासोपारा आणि बोईसर विधानसभा मतदारसंघासाठी शिवसेना शाखा, वसई नवघर माणिकपूर, पंचवटी रोड, वसई पश्चिम येथे मुलाखती घेतल्या जातील. उमेदवारांनी मुलाखतीसाठी एक तास आधी उपस्थित राहावे. तसेच येताना आपले aछायाचित्र आणावे. कार्यकर्त्यांसाठी माहिती अर्ज मुलाखतीच्या ठिकाणी ठेवण्यात येतील.



























































