..तर समाजात चुकीचा संदेश जाईल! आयएनएक्सप्रकरणी जामीन नाकारला

244

आयएनएक्स मनी लाँडरिंग प्रकरणात माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांच्यावरील आरोप हे अत्यंत गंभीर असून ते या प्रकरणात प्रमुख सूत्रधार आहेत. त्यामुळे त्यांना जामीन दिला तर समाजात चुकीचा संदेश जाईल, असे सांगत दिल्ली उच्च न्यायालयाने चिदंबरम यांचा जामीन अर्ज फेटाळला. आयएनएक्स मनी लाँडरिंगप्रकरणात जामीन मिळावा, यासाठी चिदंबरम यांच्या याचिकेवर 8 नोव्हेंबरला सुनावणी झाली.

सुनावणीनंतर या प्रकरणावरील निकाल राखून  ठेवण्यात आला होता. त्यावर आज सुनावणी झाली असता दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सुरेश कैत यांनी चिदंबरम यांचा जामीन फेटाळला. मनी लाँडरिंग प्रकरणात ईडीने चिदंबरम यांना 16 ऑक्टोबरला अटक केली होती.

 

आपली प्रतिक्रिया द्या