CSK तिकीट विक्रीद्वारे शहीद सीआरपीएफ जवानांच्या कुटुंबीयांना मदत करणार

29

सामना ऑनलाईन, मुंबई

IPL 2019 ची सुरुवात 23 मार्च पासून होणार आहे. पहिल्या सामन्याच्या तिकीट विक्रीतून जमा होणारी सगळी रक्कम ही पुलवामा इथे शहीद झालेल्या CRPF जवानांच्या कुटुंबीयांना देण्याचा निर्णय चेन्नई सुपरकिंग्जचे संचालक राकेश सिंह यांनी जाहीर केलं आहे.

आयपीएलचा पहिला मुकाबला अत्यंत रंजक होण्याची शक्यता आहे कारण या सामन्यामध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपरकिंग्ज आणि विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात लढत होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या