IPL 2020 – हैद्राबादचा दिग्गज खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर, ‘या’ खेळाडूला 3 वर्षांनंतर लागली लॉटरी

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेत पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून 10 धावांनी गमावलेल्या सनरायझर्स हैद्राबाद संघाला तगडा धक्का बसला आहे. हैद्राबादचा स्टार अष्टपैलू खेळाडू मिशेल मार्श (Mitchell Marsh) दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर फेकला गेला आहे. सनरायझर्स हैद्राबादने सोशल मीडियावर ट्विट करून याची माहिती दिली आहे.

मिशेल मार्श संपूर्ण स्पर्धेतून बाहेर फेकला गेला आहे. तो दुखपतीतून लवकर सावरावा अशी कामना करत त्याच्या जागी जेसन होल्डर याचा संघात समावेश करण्यात आला आहे, असे ट्विट सनरायझर्स हैद्राबादने केले आहे.

दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाविरुद्ध झालेल्या लढतीत मिशेल मार्श याला दुखापत झाली होती आणि यामुळे तो सामना सुरू असताना मैदानावरून बाहेर गेला होता. आता तो संपूर्ण स्पर्धेला मुकणार असल्याचे समोर आले असून त्याच्या जागी वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डर याला संघात स्थान देण्यात आले आहे. आयपीएल लिलावादरम्यान त्याच्यावर कोणत्याही संघाने बोली लावली नव्हती, तर मार्शला हैद्राबाद संघाने 2 कोटींना खरेदी केले होते.

Photo – IPL मध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे टॉप 5 खेळाडू

3 वर्षांनी पुनरागमन
आयपीएलमध्ये जेसन होल्डर 3 वर्षांनी खेळताना दिसणार आहे. याआधी 2016 ला तो आयपीएल खेळला होता. 5 लढतीत फलंदाजीत 38 धावा आणि गोलंदाजीत 5 विकेट्स अशी त्याची कामगिरी आहे. नुकत्याच झालेल्या कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धेत त्याने 10 लढतीत 10 विकेट्स घेतल्या आहेत.

सॅमसनची तुफानी खेळी, अशी कामगिरी करणारा RR चा पहिला खेळाडू; राहुलच्या विक्रमाचीही केली बरोबरी

आपली प्रतिक्रिया द्या