IPL 2025 – अगदी थाटात! सुदर्शन आणि गिलचा विध्वंस, दिल्लीचा धुव्वा उडवत गुजरातली प्लेऑफमध्ये एन्ट्री

दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर साई सुदर्शन आणि शुभमन गिल यांनी धुवाँधार फलंदाजी करत गोलंदाजांच्या अक्षरश: चिंध्या केल्या. चेंडू टाकावा कुठे? या प्रश्नाचं उत्तर दिल्लीच्या गोलंदाजांना सामना संपेपर्यंत काही सापडलं नाही. दिल्लीने दिलेले 200 धावांच आव्हान गुजरातने अगदी थाटात एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. साई सुदर्शनने 61 चेंडूंमध्ये 12 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 108 धावांची नाबाद खेळी केली. तर, कर्णधार शुभमन गिलनेही आपले हात धुवून घेत 53 चेंडूंमध्ये 3 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 93 धावा चोपून काढल्या. दोघांनी केलेल्या खेळीमुळे 19 व्या षटकातच गुजरातने आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला. या विजयासह गुजरातचा प्लेऑफमधील प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे.