IPL 2025 – अभिषेक शर्माची विस्फोटक खेळी व्यर्थ; गुजरातचा हैदराबादवर 38 धावांनी दमदार विजय

गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरातने आपला दबदबा कायम ठेवत हैदराबादचा 38 धावांनी पराभव केला आहे. गुजरातने प्रथम फलंदाजी करताना हैदराबादला 225 धावांचे आव्हान दिले होते. हैदराबादचे विस्फोटक खेळाडू सामन्यात चुरस निर्माण करतील अशी क्रीडा प्रेमींना अपेक्षा होता. परंतु अभिषेक शर्मा (41 चेंडू 74 धावा) व्यतिरिक्त इतर एकही फलंदाजी मैदानार फारकाळ टिकू शकला नाही. टप्याटप्याने विकेट पडत गेल्यामुळे संघाला 20 षटकांमध्ये 6 गड्यांच्या मोबदल्यात 186 धावांपर्यंत मजल मारता आली. मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णाने प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या. इशांत शर्मा आणि कोएत्झी यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेत संघाच्या विजयात खारीचा वाटा उचलला.