IPL 2025 – अभिषेक शर्माच वादळ पुन्हा एकदा गोंगावलं, हैदराबादने लखनऊला नमवलं; 6 विकेटने केला पराभव

प्रथम फलंदाजी करताना लखनऊने दमदार फलंदाजी करत 7 गड्यांच्या मोबदल्यात 205 धावांपर्यंत मजल मारली होती. आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या हैदराबादची सुरुवात थोडी खराब झाली. 17 या धावसंख्येवर अथर्व तायडेच्या (13 धावा) स्वरुपात हैदराबादला पहिला हादरा बसला. त्यामुळे संघ काहीसा अडचणीत आला होता. परंतु अभिषेक शर्माने संघाची सुत्र आपल्या हाती घेत एका बाजूने आपल्या विस्फोटक अंदाजात फलंदाजी सुरू केली. त्याने फक्त 20 चेंडूंमध्ये 4 चौकार आणि 6 खणखणीत षटकारांच्या मदतीने 59 धावा चोपून काढल्या. त्यानंतर आलेल्या इशान किशन (35), क्लासेन (47) आणि कामिंदू मेंडिस (32) यांनी केलेल्या आक्रमक फलंदाजीमुळे संघाचा विजय सोपा झाला आणि हैदराबादने 10 चेंडू बाकी ठेवत 6 विकेटने लखनऊचा पराभव केला.