बंद स्टेडिअममध्ये आयपीएल खेळवावे, प्रसिद्ध क्रिकेटपटूची इच्छा

1095

इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलच्या यंदाच्या पर्वाबाबत सर्वत्र साशंकता आहे. मुंबईत 29 मार्चपासून यंदाचा हंगाम सुरू होणार होता. मात्र, तत्पूर्वीच लॉकडाऊनमुळे तो होऊ शकला नाही. त्यावर एका प्रसिद्ध क्रिकेटपटूने मत व्यक्त केलं आहे.

कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊनची परिस्थिती असताना आयपीएलबाबतही संभ्रम आहे. दुसरीकडे आयपीएलमध्ये खेळणारा कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू पॅट्रिक कमिंसने मात्र आपलं वेगळं मत व्यक्त केलं आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, हिंदुस्थानी क्रिकेटप्रेमी अत्यंत उत्साही असतता. चौकार किंवा षट्कारावर ते उत्स्फूर्त प्रतिक्रिया देतात. म्हणून हिंदुस्थानी प्रेक्षकांसमोर खेळणं ही एक वेगळीच मजा असते. मात्र, यंदा कोविड 19मुळे आयपीएलवर अनिश्चिततेचं सावट आहे. त्यामुळे हे सामने खेळवलेच तर ते बंद स्टेडिअममध्ये खेळवण्यात यावेत असं मत कमिंसने मांडलं आहे.

patrick-cummins

तो म्हणाला की, हो, या सामन्यांना प्रेक्षक नसतीलच. त्यामुळे त्यांची कमतरता कायम जाणवेल. पण अशा बिकट परिस्थितीत जर सामने खेळवले गेले तर लोकांना सर्वकाही ठीक असल्याची प्रेरणा मिळत राहील, असं कमिंसचं म्हणणं आहे. अर्थात हे माझं मत असलं तरी लोकांची सुरक्षितता प्राधान्याने लक्षात घेऊनच निर्णय घ्यावा, असं त्याचं म्हणणं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या