आयपीएलमधून बॉलीवूडचा जलवा बाद होणार? बीसीसीआयकडे प्रस्ताव

709
ipl

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)च्या ओपनिंग सेरेमनीला ‘गुड बाय’ करण्याची शक्यता आहे. नियामक मंडळाचं म्हणणं आहे की, बॉलीवूड स्टाइलने उद्धाटन समारोह करणं हे अत्यंत खर्चीक काम आहे. ओपनिंग सेरेमनीवर सुमारे 30 कोटी रुपये खर्च केले जातात. त्यामुळे हा खर्च टाळण्यासाठी ओपनिंग सेरेमनी बंद करण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सोमवारी आयपीएल गर्व्हनिंग काउंसिलच्या बैठकीत आयपीएलमधून ओपनिंग सेरेमनी हटवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. तसेच आयपीएल गर्व्हनिंग काउंसिल नो-बॉलवर नजर ठेवण्यासाठी चौथा पंच ठेवण्यावर विचार करत आहे.

BCCI च्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘उद्घाटन समारोह म्हणजे पैशांची उधळपट्टी आहे. क्रिकेटप्रेमी या कार्यक्रमात विशेष रस घेत नाहीत. उलट कलाकारांवर अधिक खर्च करावा लागतो.’

गेल्या काही वर्षांचा विचार केला तर बॉलीवूड स्टार्ससोबत आंतरराष्ट्रीय पॉप स्टार – केटी पेरी, एकॉन आणि पिट बुल यांनी आतषबाजी आणि लेझर शो द्वारे आयपीएल उद्घाटन समारोहात परफॉर्मन्स केला होता. यावर प्रचंड पैसे खर्च होतात. त्यामुळे आता अशा समारोहांना कात्री लावण्यात येण्याची शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या