
यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन आयपीएस होण्याचे स्वप्न पूर्ण केलेल्या बिरदेव डोणे यांचे देशभरातून कौतुक झाले. मेंढपाळाच्या लेकाला सर्वसामान्यांनी डोक्यावर घेतले. बिरदेव यांनी कुटुंबीयांना हैदराबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीची भेट घडवून आणली. त्यासाठी त्यांचे कुटुंबीय विमानातून हैदराबादला पोहोचले. त्यांच्या आई-वडिलांसाठी हा पहिलाच विमान प्रवास होता. नऊवारी साडीतील आई अन् अंगावर घोंगडं घेऊन त्यांचे वडील या प्रवासात सगळ्यात उठून दिसले. आई-वडिलांना पहिला विमान प्रवास घडवताना बिरदेव यांनाही अतीव आनंद झाला. तो त्यांनी फेसबुक पोस्टमधून व्यक्त केला.




























































