इक्बाल मिर्चीची दुबईतील 200 कोटींची मालमत्ता जप्त

इक्बाल मिर्चीच्या दुबईतील संपत्तीवर अखेर ईडीने कारवाईचा बडगा उगारला आहे. ईडीकडून मिर्चीची दुबईतील तब्बल 203.27 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली असल्याचे एका वृत्तसंस्थेतर्फे देण्यात आले आहे. या कारवाईत एका हॉटेल अपार्टमेंटसह 14 व्यापारी आणि निवासी इमारतींचा समावेश आहे. या मालमत्ता इक्बाल मिर्चीच्या नातेवाईकांच्या नावावर असल्याचे कळते.

मुंबईत इक्बाल मिर्ची आणि त्याच्या पुटुंबीयाची पाच मालमत्ता आहे. त्याशिवाय खंडाळा येथे सहा एकर जमीन मेसर्स व्हाइटच्या नावावर आहे. त्याचा ताबा इक्बालच्या दोन्ही मुलांकडे आहे. तर मुंबईतील साहिल बंगलो इक्बालची पत्नी आणि मुलाच्या नावावर आहे. तर वरळीतील समंदर महल ही मालमत्ता इक्बालची बहीण आणि मेव्हुण्याच्या ताब्यात आहेत.

कोण आहे इक्बाल मिर्ची
1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपींपैकी एक आरोपी म्हणजे इक्बाल मिर्ची. दाऊद टोळीच्या अमली पदार्थांचा बाजार तो सांभाळत होता. त्याला पकडण्यासाठी इंटरपोलने नोटीसही जारी केली होती. 1995 मध्ये इक्बाल विदेशात पळून गेला होता. तर 2003 मध्ये इक्बालचा लंडनमध्ये मृत्यू झाला होता.

आपली प्रतिक्रिया द्या