Air India Plane Crash – विमानाचा तुकडा चहाच्या दुकानावर पडला, 15 वर्षांच्या मुलाचा होरपळून मृत्यू; आई गंभीर जखमी

अहमदाबादहून लंडनच्या दिशेने निघालेल्या एअर इंडियाचे विमान कोसळून भीषण दुर्घटना घडली. हिंदुस्थानच्या इतिहासातील ही अत्यंत भीषण विमान दुर्घटना असून अवघा देश सुन्न झाला आहे. या अपघातात 290 जणांचा मृत्यू झाला असून विमानातील रमेश विश्वास कुमार हा एकमेव प्रवासी बचावला. जिथे हे विमान कोसळले ते बी. जे. मेडिकल कॉलेजमधील डॉक्टरांचे वसतिगृह व लगतचा परिसरही बेचिराख झाला. त्यामुळे या परिसरातील काही नागरिक दगावल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये एका 15 वर्षांच्या मुलाचाही मृत्यू झाला आहे.

दुर्घटनाग्रस्त बोईंग 787 ड्रीमलायनर’ विमान गुरुवारी दुपारी 1 वाजून 47 मिनिटांनी झेपावले आणि काही सेकंदातच रहिवासी भागात कोसळले. विमान कोसळलेल्या परिसरातील बी. जे. मेडिकल कॉलेज हॉस्टेलच्या बाहेर एक कुटुंब चहाचे दुकान चालवायचे. विमानाच्या अपघातानंतर क्षणातच परिसरात प्रचंड आग लागली. यावेळी विमानाचा एक तुकडा या चहाच्या दुकानावर पडला. यावेळी दुकानात आई रेखा यादव आणि तिचा 15 वर्षांचा मुलगा आकाश यादव दोघेही होते.

Air India Plane Crash – ATS ने DVR ताब्यात घेतला; ढिगाऱ्यातून एक ब्लॅक बॉक्स सापडला; कशी घडली दुर्घटना? लवकरच समोर येणार

रेखा आणि आकाश नेहमीप्रमाणे आपले चहाचे दुकान चालवतं होते. मात्र नियतीच्या मनात काही वेगळेचं होते. अचानक विमानाचा एक तुकडा दुकानावर पडला आणि आईने आपला मुलगा गमावला. ज्यावेळी विमान कोसळलं तेव्हा सर्वत्र आगीचे लोळ पसरले होते. ही आग इतकी भयंकर होती की त्या आगीत होरपळून या 15 वर्षांच्या आकाशचा मृत्यू झाला. तर त्याची आई रेखा गंभीररित्या जखमी झाली आहे. सध्या त्यांच्यावर सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचं निधन

मिळालेल्या माहितीनुसार, विमानातील 241 प्रवाशांसह 290 हून अधिक लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन नवजात बालके, 11 लहान मुले तसेच 169 हिंदुस्थानी, 53 ब्रिटीश, 1 कॅनेडियन, 7 पोर्तुगीज नागरिकांचा समावेश आहे. यामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचं देखील निधन झालं आहे.

Air India Plane Crash – रिक्षा चालवून शिक्षण केलं, कंपनीने लंडनला पाठवलं; पहिल्याचं विमानप्रवासात कुटुंबाने लेकीला गमावलं!