
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा एकदा इराणडून धमकी देण्यात आली आहे. इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांचे जवळचे सल्लागार हस्ती जावेद लारीजानी यांनी म्हणाले आहेत की, ट्रम्प आता फ्लोरिडामध्येही सुरक्षित नाहीत. या धमकीमुळे अमेरिका अलर्ट मोडवर आहे.
ही धमकी अमेरिकेने इराणच्या परमाणु ठिकाण्यांवर केलेल्या हवाई हल्ल्यांनंतर आली आहे. लारीजानी यांनी म्हटले की, ट्रम्प यांच्या कृतींमुळे ते इराणच्या निशाण्यावर आले आहेत. त्यांनी ड्रोन हल्ल्याची शक्यता व्यक्त करत, ट्रम्प यांच्या हत्येसाठी 2 कोटी 70 लाख डॉलरच्या बक्षीस देण्याची घोषणा केली आहे.या पार्श्वभूमीवर अमेरिकेने आपली सुरक्षा यंत्रणा अधिक मजबूत केली आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव वाढत असताना, हा धोका कितपत गंभीर आहे, याबाबत सध्या तपास सुरू आहे.