
इराण येथील एका व्यसनमुक्ती केंद्रात शुक्रवारी भीषण आग लागली. या दुर्घटनेत 32 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे, तर 16 जण जखमी झाले आहे. इराणच्या उत्तर भागातील लँगरोड शहरात हे व्यसन मुक्ती केंद्र आहे.
या केंद्रात 40 जण दाखल होते. अद्याप या आगीमागचं कारण अज्ञात आहे. अचानक आग लागल्याने 32 जण जिवंत होरपळले आणि मृत्युमुखी पडले. 16 जणांना वाचवण्यात यश आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.



























































