लग्न समारंभात आगीचं तांडव, 100 जण मृत्युमुखी तर 150 जण गंभीर जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एका लग्न समारंभात आग लागल्याने इराक येथे सुमारे 100 जणांचा होरपळून मृत्यु झाला आहे, तर 150 जण गंभीर जखमी झाले आहेत. आगीचं कारण अद्याप अज्ञात आहे. ही घटना इराकच्या उत्तर भागात झाली आहे.

इराकच्या आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर इराकमधील हमदानियाह येथे हा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यात आग लागल्याने 100 जण दगावले आहेत. तर 150 लोक गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तेथील स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

या हॉलमध्ये काही पॅनल्सची निर्मिती करण्यात आली होती. हे पॅनल्स सुरक्षा मानकांचं उल्लंघन करणारे आणि अत्यंत ज्वलनशील होते. त्यामुळे हॉलचा काही भागही कोसळला आहे. या लग्नावेळी आतिषबाजी करण्यात आली. त्या आतिषबाजीमुळे ही आग लागली.