‘आयआरडीए’च्या नव्या नियमांचा पॉलिसीधारकांना फटका, प्रीमियम काढण्याची भीती

686

विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाच्या (आयआरडीए) प्रस्तावित ‘नियम 2019’ लागू करण्यात आला तर उद्योग क्षेत्रात मोठी उलथापालथ होणार असून गैरव्यवहाराचे प्रमाण वाढणार आहे. यामुळे प्रीमियमही वाढणार असून याचा फटका पॉलिसीधारकांना बसणार असल्याचे ‘असोसिएशन ऑफ इन्व्हेस्टिगेटर्स अँड डिटेक्टिव्हज’चे अध्यक्ष सुरेंद्र जग्गा यांनी सांगितले.

विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून प्रस्तावित नियम 2019 कार्यान्कित करण्यात येणार आहे. मात्र यामुळे आधीच संकटात असलेल्या देशातील वाहन उद्योग आणि अर्थव्यवस्थेला आणखी फटका बसणार असल्याचे जग्गा यांनी प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. प्रस्तावित नियमात 75 हजारांपर्यंतच्या दाव्यांना स्वतंत्र नुकसान प्रणालीच्या बाहेर ठेवण्यात येणार आहे. यामध्ये 75 हजारांपर्यंत दाव्यांसाठी सर्व्हेयर्स कोणतीही आवश्यकता लागणार नसून तोडगा लवकर निघेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत असली तरी यामुळे प्रिमीयर वाढणार असल्याचे ते म्हणाले. दाव्यांची सत्यता मूल्यांकन व्यवस्थेकडून तपासली गेली नाही तर किंवा विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून सर्व्हेयर काम गेले तर वाहनाची दुरुस्ती, उपचारांची बिले वाढवता येणार असल्याचे ते म्हणाले.

दरम्यान, अधिकृत यंत्रणेशिवाय दावे निकाली काढले तर भ्रष्टाचार वाढेल असे आशीष देसाई यांनी सांगितले. वाहन विम्याच्या घोटाळ्यांचे प्रमाण 15 टक्क्यांवरून 25 टक्के होईल अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

आपली प्रतिक्रिया द्या