क्रिकेटचे मैदान गाजवल्यानंतर आता इरफान चित्रपटात नशीब आजमावणार, पाहा चित्रपटाचा टीझर

टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठान याने क्रिकेटचे मैदान गाजवल्यानंतर आता तो चित्रपटसृष्टीत त्याचे नशीब आजमवत आहे. इरफान लवकरच आपल्याला कोब्रा या चित्रपटात दिसणार असून या चित्रपटाचा टीझर लाँच करण्यात आला आहे. या टीझरला आतापर्यंत 80 लाख व्ह्यूज मिळाले आहेत.

कोब्रा चित्रपटात दक्षिणेकडील प्रसिद्ध अभिनेता चियान विक्रम याची मुख्य भूमिका असून श्रीनिधि शेट्टी, केएस रविकुमार, मिया जॉर्ज और मृणालिनी रवि हे देखील या चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटात इरफान पठान तुर्कीतील एका इंटरपोल अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. तर चियान हा एका गणिततज्ज्ञाच्या भूमिकेत दिसेल.

क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर अनेकदा इरफान काँमेंट्री करताना दिसला. इरफानने त्याच्या करिअरमध्ये 173 इंटरनॅशनल सामने खेळले आहेत. त्यात त्याने 301 विकेट घेतल्या असून 2821 ऱन बनवले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या