इरफान खानचा जुना मेसेज वाचून मुलगा बाबिल झाला भावुक

बॉलीवूड अभिनेते इरफान खान यांचा गेल्यावर्षी 29 एप्रिल रोजी कर्करोगाने मृत्यू झाला. इरफान यांनी अनेक अजरामर भूमिका साकारल्या. आजही चाहत्यांना त्यांच्या जाण्याचे प्रचंड दुŠख आहे. इरफान यांचा मुलगा बाबिल अनेकदा वडिलांबद्दल सोशल मीडियाकर पोस्ट लिहीत असतो. आजही बाबिलने सोशल मीडियावर इरफान यांचा एक जुना मेसेज शेअर केला आहे. हा मेसेज इरफान यांनी बाबिलला मार्च 2020 मध्ये केला होता. इरफानने लिहिले होते, तू फोन सोबत घेऊन ये, मी पुढचं पाहून घेईन. दुसरा मेसेज होता, जेव्हा मोकळा वेळ मिळेल तेव्हा मला फोन कर तर तिसरा मेसेज होता, बाबिल, मला लगेच फोन कर, खूप महत्त्काचं आहे.

बाबिल जेव्हा त्याच्या फोनमधून जुने मेसेज डिलीट करत होता, त्यावेळी त्याला हे मेसेज दिसले. ते मेसेज पाहून बाबिल भावुक झाला. बाबिलने हे मेसेज सोशल मीडियावर शेअर केले आणि लिहिलं, माहीत नाही का पण मी आता या मेसेजवर उत्तर देणार होतो. मला जणू असं वाटलं की ते माझ्यासोबतच आहेत इथे कुठेतरी.

आपली प्रतिक्रिया द्या