
सामना ऑनलाईन । मुंबई
राज्यातील दुर्गम भागातील मुलांचा कुपोषणामुळे मृत्यू ओढवतो. अद्यापही ही संख्या आटोक्यात आलेली नाही. यावरून मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारचे आज कान टोचले. कुपोषणामुळे बालमृत्यूचे प्रमाण कमी झालेले नाही, सरकारी उपाययोजना करूनही बालमृत्यूच्या घटना सुरूच आहेत. त्यामुळे बालमृत्यूच्या कारणांचा शोध घेण्यासाठी शासनाने तज्ञांची समिती का नेमली नाही, असा सवाल करीत हायकोर्टाने सरकारला झापले. एवढेच नव्हे तर ‘आयआयटी’, ‘टीस’सारख्या इन्स्टिटय़ूटची त्यासाठी मदत घेण्याचा सल्लाही खंडपीठाने सरकारला दिला.































































