इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू प्रचारसभा सोडून पळाले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गाझापट्टीतून अचानक रॉकेटहल्ला झाल्यामुळे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना सभा सोडून काही वेळेसाठी सुरक्षितस्थळी आश्रय घ्यावा लागल्याची घटना बुधवारी घडली. दक्षिण इऩस्रायलमधील ऍश्केलॉन शहरात ही प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी हा रॉकेटहल्ला झाल्याचा भोंगा वाजल्याने ते सुरक्षितस्थळी गेले. मात्र, तणावाची स्थिती निवळल्यानंतर नेतान्याहू पुन्हा प्रचारसभेमध्ये सहभागी झाले. ऍश्केलॉन शहरावर रॉकेटहल्ला झाल्याच्या कृत्ताला इस्रायली लष्कराने दुजोरा दिला आहे. पॅलेस्टाईनपासून हे शहर केवळ 12 कि.मी. अंतराकर आहे. मात्र, हे रॉकेट लक्ष्यापर्यंत पोहचू शकले नाही. इस्रायलच्या आर्यन डोम एअर डिफेन्स इंटरसेप्टर सिस्टीमने हे रॉकेट हवेतच नष्ट केले. इस्लामिक जिहाद या छोटय़ा गटाचा गेल्या महिन्यात इस्रायली लष्कराबरोबर दोन दिवस संघर्ष झाला होता. रॉकेटहल्ला झाल्याचे भोंगे वाजू लागताच नेतान्याहू यांच्या सुरक्षारक्षकांनी त्यांना तत्काळ सुरक्षितस्थळी हलवले.