
इस्रायलमधील एका चिमुरड्याचे मराठी बोल सध्या व्हायरल होत आहेत. व्हिडीओमध्ये इस्रायलमधील एक यहुदी मुलगा अस्खलित मराठी बोलत आहे. या वेळी एक मराठी महिला त्याला मराठीतून त्याचे नाव विचारते. त्यावर तो माझे नाव ग्याबी आहे, असे सांगतो. त्यानंतर ती महिला तू कुठे राहतोस हे विचारते. त्यावर तो मी क्लार्क हाऊसमध्ये राहतो, असे सांगतो. त्यानंतर महिला त्याला तुला मराठी कोणी शिकवले, असे विचारते. त्यावर तो मीच, असे म्हणून हसतो.हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @digitalkesari या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत 10 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. चिमुकल्याच्या मराठी बोलावर नेटकरी खूश आहेत. तसेच अनेक नेटकरीही यावर कमेंट्स करीत आहेत.