
ओलिसांची सुटका व्हावी यासाठी सध्याच्या संघर्षात अल्पविराम घेण्याचा विचार इस्त्रायल करू शकतो, असे पंतप्रधान नेतान्याहू यांनी एबीसी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. युद्ध संपल्यावर गाझातील सुरक्षेची जबाबदारी अनिश्चित काळासाठी इस्त्रायलकडेच असेल असे सांगत त्यांनी, गाझावर नियंत्रण ठेवण्याचा इस्त्रायलचा इरादा असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
ओलिसांची सुटका करण्यासाठी आणि पॅलेस्टिनींना मदत देण्यासाठी ते काही काळ युद्ध थांबवू शकतात, असे ते म्हणाले.



























































