
हिंदुस्थानची अंतराळ संस्था इस्रो ‘चांद्रयान 4’ मोहिमेच्या तयारीत आहे. या मोहिमेत चंद्राच्या पृष्ठभागावर विक्रम लँडर सुरक्षितपणे उतरू शकेल अशी जागा शोधण्यात इस्रोला यश आले आहे. ही जागा चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय क्षेत्रात आहे.
इस्रोची 2028 साली होणारी ‘चांद्रयान 4’ मोहीम गुंतागुंतीची आहे. मोहिमेत चंद्राच्या पृष्ठभागावरून सॅम्पल घेऊन सुरक्षितपणे पृथ्वीवर परतणे हा अवघड टप्पा पार करावा लागणार आहे. ‘चांद्रयान 4’ मोहिमेत विक्रम लँडर महत्त्वाची भूमिका बजावेल. त्यामुळे विक्रम लँडरची सेफ लँडिंग साइट खूप महत्त्वाची आहे. विक्रम लँडर चंद्रावर सुरक्षितपणे उतरणे आवश्यक आहे.
लॅण्डिंग लोकेशन कसे शोधले
इस्रोच्या स्पेस ऑप्लिकेशन सेंटर्सच्या संशोधकांनी ‘चांद्रयान 2’च्या कक्षेत लावलेल्या पॅमेऱयांमधील हाय रिझोल्युशन पह्टोंच्या विस्तृत विश्लेषणानंतर सुरक्षित जागा निश्चित केली. ही जागा चंद्राच्या मोन्स माऊंटन पर्वताजवळ आहे.
आतापर्यंतच्या मोहिमेसाठी ती सर्वाधिक सुरक्षित मानली जात आहे.
इस्रोची ‘चांद्रयान 4’ मोहीम ही सर्वात कठीण मानली जात आहे. या मोहिमेत चंद्राच्या पृष्ठभागावर विक्रम लँडर उतरेल. प्रग्यान रोव्हरप्रमाणे रोबोटिक सिस्टमने सँपल गोळा करेल आणि त्यानंतर ते रि-एंट्री मॉडय़ुलने पृथ्वीपर्यंत आणले जाईल. अमेरिका, रशिया आणि चीन या देशांनी चंद्रावरून सॅम्पल घेऊन पृथ्वीवर सुरक्षितपणे परतण्याचे मिशन फत्ते केलेले आहे.





























































