इस्रोचे मेक इन इंडिया, पाच पीएसएलव्ही तयार करण्यासाठी हिंदुस्थानी कंपन्यांना आमंत्रण

1045

इस्रोने मेक इन इंडिया मोहिमेत सहभागी होत ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक यान म्हणजे पीएसएलव्हीच्या निर्मितीसाठी  हिंदुस्थानी कंपन्यांकडून स्वारस्य प्रस्ता मागले आहेत. या निर्णयामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामेक इन इंडियामोहिमेला मोठे बळ मिळणार आहे. इस्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे.

सिवन म्हणाले, सध्या आम्ही स्वारस्य प्रस्ता मागले आहेत. या योजनेत कोणत्याही परदेशी कंपनीला सहभागी करून घेतले जाणार नाही. इस्रो या प्रस्तावाचा गांभीर्याने विचार करीत आहे.

इस्रोचे यंदा सुर्णमहोत्सवी र्ष आहे. हा निर्णय इस्रोच्या काटचालीतील एक महत्त्वाचा टप्पा ठरेल. यासंदर्भात विक्रम साराभाई अकाश केंद्रातील एका अधिकार्‍याने सांगितले की एक पीएसएलव्ही तयार करण्यासाठी सुमारे 200 कोटी रुपये खर्च येतो. याचा अर्थ इस्रो खासगी कंपन्यांकडून पाच याने बांधून घेणार असल्यास त्याचे कंत्राट किमान एक हजार कोटी रुपयांचे असेल.

पीएसएलव्ही तयार करण्यासाठी होणार्‍या खर्चावर सिकन यांनी भाष्य करणे टाळले. इस्रोची नवी शाखा असलेल्या न्यू स्पेस इंडिया लिमिटेडकर (एनएसएलआय) खासगी कंपन्यांना प्रक्षेपक यान बांधणीचे तंत्रज्ञान हस्तांतरित करण्याची जबाबदारी सोपण्यात आली आहे. ही उपकंपनी 6 मार्च रोजी स्थापन करण्यात आली आहे. हिंदुस्थानी कंपन्यांकडूनपीएसएलव्हीबांधून घेणे हीच या उपकंपनीची जबाबदारी आहे.

हिंदुस्थानी कंपन्या आव्हान पेलतील का

हिंदुस्थानी कंपन्या हे आव्हान पेलण्यासाठी तयार आहेत का, याबाबत सिकन म्हणाले, तयार आहेत असे आम्हाला वाटते. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड, लार्सन अँड टुब्रोसारख्या महाकाय कंपन्यांनी यापूर्वीच पीएसएलव्हीर काम सुरू केले आहे. या कंपन्या समूह बनवून प्रक्रियेत सहभागी होतील आणि काम दाखवून देतील. किंबहुना, फक्त समूहांनाच स्वारस्य प्रस्ता सादर करता येतील, अशी अटचएनएसएलआयने घातली आहे. स्वारस्य प्रस्ता सादर करण्याची अंतिम मुदत 6 सप्टेंबरपर्यंच आहे. ‘एचएएलआणिएल अँड टीयांनी समूहस्थापनेसाठी (कंसोर्टियम) करार केला आहे. ते लवकरच उत्पादन सुरू करतील. गोदरेज आणि इतर काही छोट्या कंपन्यांही यात सहभागी होतील,’ असे सिवन म्हणाले.

एका उपग्रह प्रक्षेपक यानासाठी येणारा खर्च सुमारे 200 कोटी रुपये आहे. पीएसएलव्हीच्या एका प्रक्षेपणामध्ये सुमारे 150 कंपन्यांचा सहभाग असतो. एचएएल आणि एल ऍण्ड टी यांचे त्यात महत्त्वाचे योगदान असेल.

आपली प्रतिक्रिया द्या