इस्रोने पुन्हा रचला इतिहास, अंतराळात पाठवले 19 उपग्रह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इस्रोने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. रविवारी हिंदुस्थानच्या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यानच्या माध्यमातून 19 उपग्रह अंतराळात पाठवण्यात आले. नवीन वर्षांतील हे पहिले ऐतिहासिक मिशन इस्रोने फत्ते केले. आंध्र प्रदेशच्या श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरच्या लाँच पॅडकरून सकाळी 10 वाजून 24 मिनिटांनी हिंदुस्थानी रॉकेट पीएसएलव्ही-सी 51 रवाना करण्यात आले.
19 उपग्रहांपैकी 13 उपग्रह अमेरिकेचे आहेत. याशिकाय ब्राझिलच्या 637 किलो वजन असलेल्या ‘अमेजोनिया’ उपग्रहाचे लाँचिंग करण्यात आले. हिंदुस्थानने ब्राझीलचा उपग्रह लाँच करण्याची पहिली केळ आहे. या लाँचिंगमुळे हिंदुस्थानने आतापर्यंत अंतराळात पाठवलेल्या विदेशी उपग्रहांची एकूण संख्या 342 झाली आहे.

उपग्रहावर मोदींचे चित्र; ई-भगवद्गीताही पाठवली

चेन्नईतील सतीश धवन सॅटेलाईट स्पेस किड्स इंडियाने तयार केलेल्या उपग्रहाच्या टॉप पॅनेलवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे चित्र कोरण्यात आले आहे. त्याशिवाय एका एसडी कार्डमधून ई-भगवद्गीताही अंतराळात पाठवण्यात आली.